क्रीडा

टी ट्वेण्टी World Cup 2021 साठी भारतीय संघाची घोषणा

अखेर BCCI ने टी ट्वेण्टी विश्वकप साठी घोषणा केली आहे. खूप दिवसापासून तर्क वितर्क काढले जात होते की भारतीय संघात कुणाला संधी मिळेल. अखेर रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी एकमत साधून ह्या संघाची निवड करण्यात आली आहे. निवड समितीने त्यांच्या निवडलेला खेळाडूना प्राधान्य दिलं आहे. असा असेल भारतीय संघ.

टी-20 विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघ :
केएल राहुल, रोहित शर्मा (उप-कर्णधार),विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वरून चक्रवर्ती, राहुल चहर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशान किशन (यष्टीरक्षक), भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, रविचंद्र आश्विन, अक्षर पटेल, Standby Player श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर.

युएईमध्ये १७ ऑक्टोंबर ते १४ नोव्हेंबर या काळात टी ट्वेण्टी वर्ल्डकप होतोय. भारताच्या गटात पाकिस्तान, साऊथ आफ्रिका, अफगाणिस्तान, इंग्लंड असे बलाढ्य संघ आहेत. पण चाहत्यांना सर्वात जास्त ओढ ही भारत विरुद्ध पाकिस्तान ह्या सामन्याची आहे. हा सामना म्हणजे क्रिकेट रसिकांना दिवाळीच असणार आहे.

निवडलेल्या संघात अनेक दिग्गज खेळाडूना लांब ठेवेले गेले आहे. त्यामुळे नवखे खेळाडू किती चांगला खेळ खेळून भारतीय संघाला विजयी करतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. निवडलेल्या संघात तुम्ही समाधानी आहात की तुमच्या मते यात अजून बदल हवे होते? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *