भारतीय पुरुष संघाने आज म्हणजेच बुधवार २२ डिसेंबर रोजी भारतीयांना आनंदाची बातमी दिली आहे. एशियाई चैंपियन्स ट्रॉफी (एसीटी) मध्ये भारताने पाकिस्तान संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. मागच्या वेळेस मस्कट मध्ये या दोन संघामध्ये सामना झाला होता त्यात दोन्ही संघ संयुक्त विजेता म्हणून घोषित केले होते. पण यावेळेस मात्र भारतीय संघाने विजय श्री घेचून आणला.
मंगळवारी जपान विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सुवर्ण पदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगलं. जपानने भारताला ५-३ ने पराभूत केलं. पण या पराभवाने खचून न जाता भारताने आज पाकिस्तान संघाला पराभूत केलं. हे कोणत्या सुवर्ण पदका पेक्षा कमी नाही.
सामन्यात भारताने पहिल्याच मिनिटाला हरमनप्रीत सिंगच्या गोलच्या जोरावर सर्वात आधी आघाडी घेतली. त्यानंतर सुमित (४५व्या), वरुण कुमार (५३व्या) आणि आकाशदीप सिंग (५७व्या) मिनिटाला गोल करत भारताला जिंकवले. लीग सामन्यात सुद्धा भारत आणि पाकिस्तान विरुद्ध सामना रंगला होता. त्या सामन्यात देखील भारताने ३-१ ने पाकिस्तान संघाला पराभूत केलं होतं.
Asian Champion Trophy मध्ये भारताला सुवर्ण पदकासाठी दावेदार मानत होते. पण भारताने जपान विरुद्ध चांगला खेळ न केल्याने सुवर्ण पदकापासून लांब राहावे लागले. फायनल मध्ये जपान संघाचा सामना दक्षिण कोरिया संघासोबत होणार आहे.