आज भारत विरुद्ध इंग्लंड संघात U19 विश्वकप संघाची फायनल मोठ्या दिमाखात पार पडली. सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम अँटीगुवा इथे हा सामना रंगला होता. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण इथे मात्र त्यांचा निर्णय चुकला. इंग्लंड संघाची सुरुवात खूप निराशाजनक झाली.
रवी कुमारने दुसऱ्याच षटकात बेथेल याला अवघ्या दोन या धाव संख्येवर बाद केले. चौथ्या शतकात रवी कुमारने प्रेस्ट याला बाद करत भारताची सुरुवात चांगली केली. जेम्स रेव ने एकहाती सामना राखला. त्याने अवघ्या 116 चेंडूत 96 धावांची महत्त्वाची खेळी केली. यात 12 चौकरांचा समावेश आहे. रवी कुमारने चार तर राज बावाने पाच गडी बाद केले.
इंग्लंड संघ अवघ्या 189 धावात गारद झाला. भारताला विजयासाठी 190 धावांचे मापक आव्हान दिलं. आव्हान तर खूप लहान होत पण भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर अंगक्रिश रंघुवांशी शून्यावर बाद झाला. भारताकडून खेळताना हरणुर सिंग २१ धावा, यश धूळ, शैक रशीद ५० धावा राज बावा ३५ धावा, निशांत सिंधू ने ५० धावा करत महत्त्वाचे योगदान दिले.
भारताने विजय श्री खेचून पुन्हा एकदा सिद्ध केलं की आपण क्रिकेट मधले सरताज आहोत. यंग ब्रिगेड ने हा सामना जिंकून संपूर्ण भारताला आनंदाची बातमी दिली आहे. प्रत्येक खेळाडूने आपापल्या परीने हातभार लावत हे भलंमोठं यश पदरात पाडलं आहे. याचा फायदा नक्की येणाऱ्या आयपीएल ऑक्शन मध्ये सर्व खेळाडूंना होईल यात काही वाद नाही.