बातमी

सर्व देवांचा राजा इंद्र देव, तरीही त्यांची पूजा होत नाही वाचा कारण

आपल्याला माहीत आहे इंद्र म्हणजे देवांचा, हिंदू धर्मातील प्रमुख देवता होय. खरं पाहायला गेलात तर इंद्र हे नाव नाही तर ते एक पद आहे. इंद्रदेव पावसाची निर्मिती करायचे तसेच स्वर्गात देवांना शासनही तेच करायचे. इंद्र देवाच्या बायकोचे नाव इंद्राणी होते. तसेच इंद्रदेव कोणाही राजा किंवा साधूला शक्तिशाली बनू देत नव्हते.

हे इंद्रदेव वैदिक काळात खूप प्रसिद्ध असे देव होते. नंतर लोक पुराणाकडे वळू लागली आणि त्यामुळे हळू हळू इंद्राची जागा कमी होऊन महादेव, विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी घेतली. याशिवाय अनेक इतर देवीदेवतांनी घेतली. हे कारण असू शकते की लोकांची पुराण कलांमध्ये इंद्राच्या प्रसिद्धीला उतरती कळा लागली.

तसेही त्या काळी इंद्रदेव यांनी आपले आसन अबाधित राहावे यासाठी बरेच प्रयत्न केले. तसेच पृथ्वीवरील लोकांची, राजांची पूजा करण्यात ही ते विघ्न आणायचे. तसेच ऋषीमुनीची यज्ञे, राक्षसांची तपश्चर्या याच्यात ही विघ्न आणायचे. हे सुध्दा महत्वाचे कारण असायला हवे ज्यामुळे इंद्राची पूजा करणे सोडले असावे. तसेच इंद्र देवामधे मनुष्य सारख्या भावना होत्या म्हणजेच इच्छा, वासना, आकांशा, असुरक्षितता असे अवगुण होते.

भगवान श्रीकृष्ण यांनी नंतर इंद्रदेव यांची पूजा करन्यास बंद केली. गोपाळकाला, होळी, रंगपंचमी हे सण सुरू केले. श्री कृष्णाचं अस म्हणणं होत की अशा एक व्यक्तीची पूजा नाही व्हायला पाहिजे जो देव किंवा देवासमान नाही त्यानंतर श्रीकृष्ण आणि इंद्र या दोघांमध्ये युद्ध झाले आणि त्यात श्रीकृष्ण जिकले आणि म्हणून इंद्रदेव यांची पूजा बंद झाली.

पण आता इंद्र देवाचे मंदिर बांधले जात नसले तरीही किंवा त्यांची पूजा केली जात नसली तरीही जेव्हा कुठेही यज्ञ केला जातो तेव्हा यज्ञाच्या सुरुवातीला आणि शेवटी इंद्राला तूप वाहून पूजा केली जाते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *