क्रीडा

आयपीएलच्या पहिल्या चरणात कोणत्या संघाने जिंकल्या किती मॅचेस?

इंडियन प्रीमियर लीगचा या वर्षीचा १४ वा सिझन खेळला जात आहे. हा सिझन भारतात सुरू झाला खरा पण फक्त मध्यांतर होऊ शकला. कारण भारतात कोरोनाच्या वाढत्या केसेस मुळे आयपीएल मध्येच थांबण्यात आले. पण पुन्हा एकदा आयपीएल त्याच जोशात १९ सप्टेंबर रोजी यूएई मध्ये सुरू होत आहे. ऐन गणपतीच्या दिवसात आयपीएल पुन्हा सुरू होतोय हे क्रिकेट रसिकांनसाठी आनंदाची गोष्ट आहे.

यूएई मध्ये होणाऱ्या ह्या सामन्याची उत्सुकता चाहत्यांना असली तरी झालेल्या मॅचेस मध्ये कोणता संघ किती मॅचेस जिंकल्या, गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे? कुणी जास्त विकेट घेतल्या आणि कुणी जास्त धावा काढल्या? हे आपण विसरून गेलो आहोत. मग चला पाहूया कोणता संघ कोणत्या ठिकाणी आहे. दिल्‍ली कैपिटल्‍स आणि पंजाब किंग्‍सने ८-८ मैच खेळले तर बाकी सर्व ६ संघाने ७-७ सामने खेळले आहेत.

यावर्षी रॉयल चैलेंजर्स बैंगलोर संघाला लय सापडला. ७ सामन्यात विराटच्या संघाने पाच सामने जिंकले आहेत. त्यांनी मुंबई इंडियंस, सनराइजर्स हैदराबाद, कोलकाता नाइटराइडर्स, राजस्‍थान रॉयल्‍स आणि दिल्‍ली कैपिटल्‍सला पराभवाची धूळ चारली. मात्र चेन्नई आणि पंजाब संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. तर सर्वाची आवडती टीम मुंबई इंडियन्सने सुद्धा चांगला खेळ खेळला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ७ सामन्यात ४ सामने जिंकले आहेत. यात त्यांनी कोलकाता नाइटराइडर्स, सनराइजर्स हैदराबाद, राजस्‍थान रॉयल्‍स आणि चेन्‍नई सुपरकिंग्‍स संघाला मात दिली. तर दिल्‍ली कैपिटल्‍स, पंजाब किंग्‍स आणि रॉयल चैलेंजर्स बैंगलोर संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. राजस्थान संघांचा हाल या पर्वात खूप खराब राहिला. त्यांनी खेळलेल्या ७ सामन्यात फक्त ३ सामने जिंकले बाकी ४ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर पंजाब संघाला ८ सामन्यात फक्त ३ सामने जिंकता आले.

कोलकाता नाइटराइडर्स ने ७ सामन्यात फक्त २ सामने जिंकले. हैद्राबाद संघाचा सर्वात वाईट प्रदर्शन यावर्षी पाहायला मिळाले. त्यांनी खेळलेल्या ७ सामन्यात फक्त १ सामना जिंकता आला आणि ६ सामन्यात पराभव पत्करावा लागला. आता राहिलेल्या सामन्यात कोणता संघ किती चांगला प्रदर्शन करून आपली जागा टॉप ४ मध्ये बनवेल हे बघणे रंजक ठरणार आहे.

आयपीएल २०२१ पॉइंट टेबल
१. दिल्‍ली कैपिटल्‍स (१२ पॉइंट्स), २. चेन्नई सुपर किंग (१० पॉइंट्स), ३. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (१० पॉइंट्स), ४. मुंबई इंडियन्स (८ पॉइंट्स), ५. राजस्थान रॉयल्स (६ पॉइंट्स), ६. पंजाब किंग्स (६ पॉइंट्स), ७. कोलकाता नाईट रायडर्स (४ पॉइंट्स), ८. सनराइजर्स हैदराबाद (२ पॉइंट्स).

सर्वात जास्त धावा शिखर धवनच्या बॅटने निघाल्या आहेत. त्याने ८ सामन्यात ३८० धावा केल्या आहेत. तर के एल राहुल ३३१, फॅफ डू प्लेसिस ३२०, पृथ्वी शहा ३०८ आणि संजू सॅमसन ने २७७ धावा केल्या आहेत. गोलंदाजी पाहता हर्षद पटेल ने सर्वात जास्त बळी घेतले आहेत. बंगलोर साठी खेळताना त्याने ७ सामन्यात १७ बळी घेतले. तर अहमद खानने १४, ख्रिस मॉरिस १४, राहुल चहर ११ आणि राशिद खान ने १० बळी घेतले आहेत.

ह्या मौसमात आतापर्यंत तीन शतके लगावली आहेत. यात जॉस बटलर (१२४), संजू सॅमसन (११९), देवदत्त पडीकल (१०१) या खेळाडूंचा समावेश आहे. उर्वरित सामन्यात अजून शतके आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. १९ सप्टेंबर रोजी पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग असा असणार आहे. त्यामुळे नक्कीच एक रंजक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *