२०२२ चे वर्ष हे आयपीएल चाहत्यांसाठी रंजक ठरणार आहे. कारणही अगदी तसेच आहे कारण या वर्षी तुमचा आवडता खेळाडू नेहमीच्या संघाकडून खेळताना दिसणार नाही. मेगा ऑक्शन मध्ये सर्व खेळाडू वेगवेगळ्या संघासाठी खेळताना आपण पाहणार आहेत. तुम्हालाही उत्सुकता लागून राहिली असेल की नक्की हा खेळाडूंचा लिलाव कोणत्या तारखेला आणि कुठे होणार आहे? चला तर मग आज तुम्हाला तारीख जाहीर करून आम्ही सांगतो.
आयपीएल २०२२ चा लिलाव दोन दिवस चालणार आहे असे बीसीसीआय कडून सांगण्यात आलं आहे. आणि हा लिलाव फेब्रुवारी महिन्यात १२ आणि १३ तारखेला बंगलोर येथे संपन्न होणार आहे. ईएसपीएनक्रिकइंफोच्या एका अहवालानुसार सर्व लिलावी खेळाडूंची यादी जानेवारी महिन्यापर्यंत पाठवली जाईल.
आयपीएल २०२२ साठी लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघाचा समावेश करण्यात आला आहे. हे दोन्ही संघ प्रत्येकी तीन खेळाडू आपल्या संघात आधीच घेऊ शकतात. ते कोणते खेळाडू आपल्या ताफ्यात घेतील हे त्यांना जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत सांगावे लागेल. त्यानुसार बाकी खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी मध्ये केला होईल.
त्यामुळे आता कोणता खेळाडू कोणत्या संघात जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे दोन नवीन संघाकडे ९० कोटी तर बाकीच्या संघाकडे ५० कोटी पेक्षा कमी रक्कम आहे. त्यामुळे नवीन संघाना आपल्या ताफ्यात खेळाडूंना घेण्यासाठी मोठी बोली लावण्याची संधी आहे. पण इतके असूनही त्यांना महत्त्वाचे असे खेळाडू आधीच इतर संघ मालकांनी आपल्याकडे राखून ठेवल्याने त्यांची निवड करता येणार नाही.
तुम्हाला काय वाटतं कोणता संघ यावेळी आयपीएल मध्ये मजबूत असणार आहे? तुमची प्रतिक्रिया आम्हला नक्की कळवा.