यूएई : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग संघात काळ पार पडलेल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात चेन्नई सुपर किंग संघाने बाजी मारत विजय मिळवला. महामारी मुळे जगातील सर्वात मोठी लीग यूएई इथे हलवण्यात आली. खूप सारे नियम आणि बंधने ठेऊन आयपीएलला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला.
आयपीएल सुरू होत असताना प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचा मनात एक प्रश्न घोंगावत होता तो म्हणजे मैदान खाली असणार, मोठं मोठ्याने ओरडणारे प्रेक्षक, चीअर्स लीडर्स नसल्याने सामना पाहताना हवा तसा आनंद मिळणार नाही. पण क्रिकेट रसिकांची ही शंका फक्त शंकाच राहिली.
कारण काळ सामना पाहताना प्रत्येकजण चकित झाला की चौकार, षटकार किंवा विकेट घेतल्यावर टीव्ही स्क्रीनवर प्रेक्षकांचा आवाज घुमू लागला. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न होताच की मैदानात प्रेक्षक नाहीत मग हा आवाज येतोय तरी कुठून? आयपीएल आयोजकांनी ह्या साठी आधीच नियोजन करून ठेवलं होतं.

मागच्या वर्षी झालेल्या निवडक सामन्यातील प्रेक्षकांचा आवाज घेऊन ह्या वर्षीच्या सामन्यात योग्य ठिकाणी बसवून ह्या सामन्याची रंगत वाढवण्याचे काम आयोजकानी केलं आहे. हे असे पाहताना समोर कधीच वाटतं नाही की प्रेक्षक मैदानात नाहीत. पाहताना असेच वाटते की मैदान तुडुंब प्रेक्षकांनी भरले आहे आणि त्यांचा आवाज चारही बाजूने घुमतोय.
शेख जायेद स्टेडियम मध्ये खेळलेल्या मैदानात २० हजार प्रेक्षक बसतील एवढी जागा आहे. पण तरीही सुद्धा सर्व नियमांचे पालन करत फक्त २२ खेळाडू व्यतिरिक्त सुरक्षा रक्षक, स्टाफ, अधिकारी आणि काही मान्यवर एवढीच माणसे मैदानात हजर होती.
पुढे येणाऱ्या प्रत्येक सामन्यात तुम्हाला प्रेक्षकांचा असाच आवाज ऐकायला मिळेल. कोणताही आयपीएल सामना पाहताना तुम्हाला कंटाळा येणार नाही ह्याची खबरदारी आयपीएल आयोजक आणि बीसीसीआय ने घेतली आहे. मैदानात मोठमोठ्या स्क्रीन लाऊन तिथे सुद्धा प्रेक्षक ओरडताना आपल्याला पाहायला मिळतात.
काहींच्या मनात असे येत होतं की चीअर्स लीडर्स नसतील तर आयपीएल पाहण्याची मज्जाच निघून जाईल. प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेट घेतल्यानंतर त्यांचा डान्स पाहण्यासारखा असतो. पण ह्याचीही कमी आयोजकांनी पूर्ण केली आहे. मैदानात जरी चीअर्स लीडर्स नसल्या तरीही मोठ्या स्क्रीन पूर्ण मैदानात लावल्या आहेत. आणि ह्याच स्क्रीनवर चीअर्स लीडर्स थिरकताना आपल्याला दिसतात.
या वर्षीही आयपीएल रंजक होण्यासाठी आयोजकांनी खूप मेहनत घेतली आहे. खास करून खेळाडूंच्या आरोग्याची काळजी कशी अधिकाधिक घेता येईल ह्याकडे त्यांनी लक्ष दिलं आहे.