जॉनी लिव्हर या हास्य कलाकाराला आपण ओळखतो पण त्याचे खरे नाव होते जॉन राव म्हणजेच प्रकाश राव जानुमाला असे आहे. हे खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यांना पहिल्यापासूनच स्कूलमध्ये अभिनय आणि कॉमेडी करण्याची आवड होती. पण त्यांची कॉमेडी लोकांना खूप आवडायची ते त्यांची प्रशंसा ही करायचे. लोक त्यांना त्याचे पैसे द्यायचे पण त्यांना वाटायचे लोक मला पैसे का देतात मला तर हे कण्यात मजा येते.
जॉनी लिव्हर यांनाही ते करण्यात मजा यायची त्यांना वाटले नव्हते की त्यांची ही आवड एक प्रोफेशन बनेल. सुरुवातीचे त्याचे घर एका बैठ्या चाळीत होते त्यात ते त्यांचे काका आणि बाबा अशी मोठी फॅमिली होती. त्यानंतर ते धारावी झोपडपट्टी मध्ये राहायला आले ते तिथे १८ वर्ष राहिले. त्यांचं ते झोपड अजूनही तिथेच आहे. ते सकाळी उठून कामाला जायचे त्यानंतर रात्री शो करायचे.
त्यानंतर हळू हळू त्यांना कळले हे लोकांना आवडते आहे यात अजून काहीतरी करायला पाहिजे मग त्यांनी नोकरी सोडली आहे अजून काहीतरी नवीन लोकांना दाखवायला सुरुवात केली. त्यांचा जन्म हा आंध्रप्रदेश मधील प्रकाशन जिल्ह्यात झाला. त्यानंतर त्यांनी खूप कमी वयात शाळा सोडली आणि मुंबई मध्ये आले तिथे ते बॉलिवूड मधील गाण्यावर डान्स करून पेन विकायचे. त्यानंतर ते हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागले तिथे ते कॉमेडी करून तेथील सह कलाकारांना हसवत असत त्यांनीच त्यांचे नाव जॉनी लिव्हर असे ठेवले.
जेव्हा ते झोपडपट्टीत राहात होते तेव्हा एकवेळचे जेवण सुद्धा त्यांच्या वाट्याला येत नव्हते. कधी कधी तर आजूबाजूच्या लोकांकडून जेवण मागून त्यांना जेवायला लागत असे. कुणी द्यायचे तर कुणी पळवून लावायचे. हा अनुभव त्यांनी खूप जवळून घेतला आहे म्हणून आता अशाच गोर गरीब लोकांना ते स्वखर्चाने जेवण देतात.
जॉनी आणि सुजाता यांचं लग्न १९८४ साली झालं. त्यांची बायको फिल्म इंडस्ट्री पासून लांबच असते पण त्यांची दोन मुले म्हाणजे मुलगा जेमी लिव्हर आणि मुलगी जेसी लिव्हर हे दोघेही बापाच्या वळणावर कॉमेडी करतात. जॉनी लिव्हर यांनी अजूनपर्यंत ३५० पेक्षा पण जास्त चित्रपट मध्ये काम केले आहे पण त्यांचा पहिला चित्रपट बाजीगर आहे. तसेच कॉमेडी सर्कस मध्ये ते जज झाले होते.

एका शो मध्ये सुनील दत्त यांची नजर जॉनी वर पडली आणि त्यांनी जॉनी यांना १९८२ मधे ‘दर्द का रिश्ता’ ह्या चित्रपट मधे त्यांना काम दिलं पण त्यानंतर मात्र त्यांना त्या इंडस्ट्री मध्ये काम मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.