मनोरंजन

रिल्स स्टार Just Neel Things अडकला विवाह बंधनात

सोशल मीडिया ओपन केल्यानंतर काही असे क्रिएटर सुद्धा असतात ज्यांच्या व्हिडिओ किती वेळा पाहिल्या तर पुन्हा पुन्हा पाहव्याश्या वाटतात. यात सर्वात अग्रेसर अशी गँग म्हणजे ऑरेंज ज्यूस गँग. यातले सर्व लोक जणू वेडे आहेत. ते सर्वांना खळखळून हसवतात. यात फोकस इंडियन, जस्ट नील थिंग्ज, सिद्धार्थ सरफेरे, शुभव जाधव, सौरभ घाटगे, संतोष आणि श्रावण शिरसागर यांचा समावेश आहे.

या सर्वांचे व्हिडिओ एकदा तरी तुम्ही सोशल मीडियाच्या कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवर पाहिलेच असतील. यातलाच एक जस्ट नील थिंग्जचे सध्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत. त्याने आपल्या लग्नाची गाठ श्रेया पुसलकर सोबत बांधली आहे. श्रेया एक फॅशन डिझायनर आणि पेंटर आहे. दोघं अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते.

अखेर घरातल्यांच्या सहमतीने आपल्या नवीन नात्याला त्यांनी सुरुवात केली. मागचा एक आठवडा हळदी संगीत आणि आता लग्नाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मोठ मोठ्या कलाकारांनी त्यांना नवीन आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात.

Source Just Neel things Social Handle

नीलने त्याच्या लग्नाची पूर्ण तयारी आपल्या vlog मार्फत लोकांना दाखवली आहे. जर तुम्ही ती पाहिली नसेल तर नक्की चॅनल वर जाऊन पहा. नील त्याच्या लग्नात खूप फिट दिसतोय. त्याने मागील ३७ दिवसात खूप वजन कमी केलं आहे. दोघांनाही त्यांच्या नवीन आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *