अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका काळूबाई च्या नावाने चांगभलं प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे, मालिकेने अल्पावधीतच निश्चित प्रेक्षकवर्ग तयार केला होता, काळूबाईच्या नावाने चांगभलं या मालिकेत आता नवी एन्ट्री होणार आहे. मुख्य नायिका आर्याच्या भुमिकेत असलेल्या प्राजक्ता गायकवाड एक दिवसात तडकाफडकी मालिका सोडली आहे. तिच्या जागी आता विना जगतापची वर्णी लागली आहे, याबद्दल अधिक माहिती अशी की प्राजक्ताच्या सेटवरच्या वागण्यामुळे सगळेच त्रस्त झाले होते.
शूटिंग दरम्यान निर्मात्यांना ही अनेक वेळा नुकसान सहन करावे लागले आहे, आपल्या मनाप्रमाणे वागणे, उशिरा येऊनही आपल्या खोलीत जाऊन लवकर बाहेर न येणे अस काहीस आपल्या मनाप्रमाणे वागणे चालू असल्याने सगळेच टीममेंबर त्रस्त झाले होते, याच वादातून तिनेही बेफिकीर पणे मालिकेला एक दिवसातच रामराम ठोकला आहे. प्राजक्तानेया आधीच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मालिकेत भूमिका केली होती, येसूबाईंच्या भूमिकेतली प्राजक्ताने प्रेक्षकांच्या वेगळे स्थान निर्मान केले होते. आई माझी काळूबाई मधेही आर्यांच्या भूमिकेत दिसली होती.

निर्मिती संस्था आणि प्राजक्ता यांच्यामध्ये झालेल्या काही वादांमुळे तिनं मालिका सोडल्याचं समजतं., प्राजक्ता सोबत अनेकदा वाद झाल्याने निर्मात्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयामध्येही बराच हस्तक्षेप असायचा त्यामुळे अनेकदा शूटिंगला गैरहजर राहणे परीक्षेचे कारण देऊन बाहेरच्या कार्यक्रमांना हजर राहणे असे वारंवार घडत असल्याने वाद वाढला होता. चित्रीकरणासाठी ऐन वेळी नकार देणं, तिच्या पेक्षा सिरनिअर ऍक्टर ही अनेक वेळा तिची वाट पाहत थांबत असत असेही सांगितले जाते.
सुट्टीसाठी परीक्षा किंवा अन्य काही कारणं देणं अशा काही गोष्टींवरुन निर्माते आणि अभिनेत्री यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं कळतं. मात्र सतत परीक्षेचे कारण देऊन गैरहजर राहणारी प्राजक्ता मात्र लोकडाऊन मध्ये कुठल्या परीक्षा देत आहे हा ही प्रश्न उभा राहिल्याने निर्मातीसंस्था आणि टीम कडून वाद शिगेला पोहोचला होता. तिनेही तुम्हाला काढायचे तर काढून टाका मालिकेतून असे सांगितल्यावर तडकाफडकी मालिका सोडली, तेव्हा विना जगतापचे नाव पुढे आल्याने तिच्याशी लगेचच संपर्क करण्यात आला, विणानेही होकार कळवत साताऱ्याला येऊन पुढील शुटिंगला प्रारंभ केला आहे. त्यातून प्राजक्ता मालिकेतून बाहेर पडली असून, तिच्या जागी अभिनेत्री वीणा जगताप दिसणार आहे.

वीणा जगताप या आधी राधा प्रेमरंगी रंगली या मालिकेत दिसली होती. त्यातून ती चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पदार्पण केल्यानंतर ‘बिग बॉस’ मराठीचा दुसरा सीझन वीणानं गाजवला होता. त्यात शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांच्या लव्ह स्टोरीचीही खुपच चर्चा झाली होती. त्यानंतर अनेक दिवस ही जोडगोळी चर्चेत होती, वीणाच्या या मालिकेआधीच्या मालिकेत विणा चांगलीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
सुंदर चेहरा या ओळखीपलीकडं जाणाऱ्या काही टीव्ही क्षेत्रातील अभिनेत्रींनी या वर्षात प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यापैकीच अभिनेत्री वीणा जगताप हिनं २०१९ या वर्षातील टीव्ही जगतातील सर्वांत आकर्षक महिला असा मान मिळाला, त्याचबरोबर आता विनाची वर्णी या मालिकेत लागल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. याचबरोबर आता काळूबाईच्या नावाने चांगभलं या मालिकेतील सर्व कलाकारांनी ही अता नकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे असे सांगितले , अलका कुबल यांनी ही आता आई काळूबाईच्या आशीर्वादाने सर्व ठीक होईल अशी आशा व्यक्त केली.