हेल्थ

घरात कापूर का जाळावा आणि त्याचे फायदे जाणून घ्या

तस पाहायला गेलात तर कापुर ही एक नैसर्गिक वस्तू आहे. पण आताच्या परिस्थितीत लोकांनी थोड्याशा पैशासाठी तिच्यामध्ये अनैसर्गिक पदार्थ मिक्स करून त्यात बदल केला आहे आणि हे आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे. त्यामुळे आपण कापूर घेताना खबरदारी घ्यायला हवी की, तो खरा आहे की नकली.

तस म्हणायला गेलात तर कापूर ही खायची वस्तू नाही पण काही ठीक आणि तिचा आहारात ही उपयोग केला जातो. तरीही ती जळल्यावर तिचा धूर आपल्या नाकात जात असतो म्हणजेच त्याचा कुठे तरी संबंध आपल्या शरीराशी येत असतो.

त्यासाठी कापूर पाण्यात टाकून बघा तो बुडला तर नकली किंवा जळल्यास त्याचा काहीच भाग उरत नाही आणि उरला तर नकली. कापूरची वडी बाहेर ठेवली असता काही काळाने ती बारीक होत जाते ती ओरिजनल आणि जीच्यावर काहीच परिणाम होत नाही जशीच्या तशी राहते ती नकली

हा कापूर जळाल्याने अँटी बॅकटेरियल, अँटी फंगल, अँटी व्हायरल असे गुण आहेत. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम शुद्ध होत आणि त्यामुळे आपले घर पवित्र होते. म्हणून शुद्ध आणि पवित्र कापूर जर तुम्ही घरात बांधून ठेवले तर किडे येत नाहीत तसेच मच्छर ही येत नाहीत. याच्या वासाने आपल्या मेंदूला शांती मिळते.

शिवाय कोरोना काळात याच्या वासाने जिवाणू विषाणू मरतात म्हणून याची मागणी वाढली आहे. यासाठी कापूर रुमालात बांधून त्याचा वास घेत रहा. सर्दी खोकला झाला असल्यास कापूर गरम पाण्यात टाकून त्याचा वाफ घ्यावा. आता आपण केमिकल युक्त रसायनांचा वापर मच्छर जाण्यासाठी करतो पण हाच कापूर झोपताना जवळ ठेवला तर याच्या वासाने मच्छर जवळ येत नाहीत.

याशिवाय जर तुमच्या डोक्यात उवा झाल्या असतील तर खोबरेल तेलात हे कापूर टाकून ठेवा आणि हेच तेल डोक्याला लावत जा त्याने ऊवा कमी होतील. याशिवाय हाच कापूर आपण शुभकार्यात किंवा रोजच्या पूजेत देवापुढे जळतो त्याने काय होते तर वातावरणात एक वेगळाच सुवास येतो, मनःशांती मिळते. शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

कापूर रोज आपल्या घरात जालावा त्यामुळे याने घरातील वातावरण तर निर्जंतुक होते शिवाय याचा आपल्या फुस्फुसांवर ही चांगला परिणाम होतो.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *