विचारधारा

कुत्रा पाळणे आपल्या घरासाठी योग्य तर आहेच बघा त्याच्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी

कुत्रा हा पाळीव प्राणी आहे हे आपण लहानपणापासून आपण अभ्यासक्रमात वाचले ही आहे आणि पाहत ही आलेलो आहोत गावात राहणाऱ्या लोकांना आजूबाजूला असणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा अनुभव असेलच. कुत्रा हा पाळीव प्राणी मानला जातो कारण तो मानसाललेला आहे.

पूर्वीपासूनच कुत्रा हा माणसाच्या सानिध्यात आलेला आहे. खर तर त्याला राखणदार म्हणतात कारण तो एक असा प्राणी आहे जी कोणतीच अपेक्षा न करता आपल्या संपूर्ण घराची राखण करत असतो. शिवाय तो इमानदार असतो हे ही खर आहे.

तुम्हाला जर घरात कुत्र पाळायचे आहे तर घरातल्या प्रत्येक सदस्याची त्यासाठी मान्यता असायला हवी. त्यांना आपल्या मुलांप्रमाणे प्रेम द्यायला हवे. काही कुत्रे इतके मानसाललेले असतात की त्यांना आपण जे काही आदेश देतो ते लगेच पाळतात. काही लोकांना त्यांचा इतका लळा असतो की ते कुठे बाहेर फिरायला गेले की कुत्र्यांना ही त्यांच्यासोबत नेतात.

कुत्रा जर तुमच्या दारात बांधलेला असेल तर तुम्हाला घाबरायच काहीच कारण नाही बिनधास्त रहा कारण आपल्या दारात कुत्रा असेल तर कोणाचीही घरात येण्याची हिम्मत होणार नाही चोराची ही नाही. तसेच कुत्रे हे दत्ताचे अस्त्र मानले जातात.

तसेच कुत्रा पाळणाऱ्या ना हृदय रोगाचा धोका कमी असतो असे एक संशोधनातून समोर आले आहे. जर तुम्ही एकटे राहत असाल तर कुत्रा नक्कीच पाळला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला एकटे ही वाटणार नाही शिवाय एकटेपणामुळे येणारा ह्रदयाच्या झटका ही येत नाही.

एक कारण असे आहे की कुत्रा आपल्या घरात असेल तर त्याच्यामुळे घरात वाईट किंवा नकारात्मक शक्ती येत नाही. त्यामुळे घरातील वातावरण जास्त करून आनंदी राहते. त्याच्या भुंकन्याने वाईट शक्ती ही बाहेर जाते.

कुत्रे पाळण्याचा एक असा तोटा आहे की त्यांच्या संपर्कात आल्याने आपल्याला वेगवेगळ्या जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो. त्यासाठी योग्य ती डॉक्टर ट्रीटमेंट असावी.

कमी खर्चात कुत्रे पाळायचे असेल तर आपले गावठी कुठे मस्तच त्यांना आपण जे खायला देऊ ते खातात. फक्त त्यांची स्वच्छ्ता ठेवणे तुमच्या हातात आहे. उगाच जास्त किमतीचे कुत्रे विकत घेऊन शो म्हणून मिरवणे हे वाईटच.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *