हेल्थ

रक्तदाब ठेवा कंट्रोलमध्ये ते ही नैसर्गिकरीत्या

सध्याच्या काळात 100 पैकी 90 टक्के लोकांना उच्च रक्तदाब हा असतोच असतो. त्याचे कारण ही अनेक आहेत. धका धकीचे जीवन, कमी वेळात आणि पटापट खाणे तसेच जास्त तेलकट, मिठाचे, आणि मसाल्याचे खाणे याशिवाय रात्री उशिरा झोपणे, झोपच न लागणे, टेंशन घेणे, कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणे या गोष्टींचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो.

या गोष्टींवर तुम्ही स्वतःकडून बदल करा. बदल हा लगेच होत नाही तर यामधे हळू हळू बदल करत जा त्यामुळे तुम्हाला याचा परिणाम ही जाणवेल. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जेवणात पूर्णपणे मीठ बंदच करा. माहित आहे मिठा शिवाय जेवण चविष्ट लागत नाही. पण तरीही प्रयत्न करा नसेलच जमत तर सैंधव मिठाचा जेवणात रोज प्रयोग करा.

रोज सकाळी पायी चाला किमान 4 किलोमिटर तरी याशिवाय प्रत्येकाने हे रोज करायलाच हवे, ज्याला बीपी असो किंवा नसो. आपल्या आयुष्यात चालणे महत्वाचे आहे. कारण ज्यांना कोणताही आजार नाही त्यांना आजार होण्याच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींवरून टेंशन घेणे टाळा, कोणतीही गोष्ट जास्त मनाला लावून घेऊ नका. मन नेहमी प्रसन्न ठेवा.

जे होते ते चांगल्यासाठीच होते हा विचार करा. टेंशन घेऊन काही त्या समस्या कमी होत नाहीत. मन प्रसन्न राहण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ देवाचे नाव घ्या. सकाळ संध्याकाळ पूजा करा. तुम्हाला आवडणाऱ्या देवाचे नामस्मरण करा ज्यामुळे तुम्हाला शांत वाटेल.
रोज प्राणायाम करा ते ही न चुकता त्याचे फायदे तुमच्या पदरात पडतीलच.

याशिवाय आहारात फळ, पालेभाज्या यांचा जास्तीत जास्त उपयोग करावा तसेच चिकन, मासे, मटण यांचा प्रयोग कमी करावा. रोज सकाळी आणि रात्री झोपताना दोन लसणाच्या पाकळ्या चाऊन खाव्यात. तुमचं वजन जास्त असेल तर ते अगोदर कमी करा त्यासाठी चालणे, व्यायाम करा आणि तेल तूप कमी खा फायबर युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *