देवमाणूस मधील प्रत्येक व्यक्तिरेखा ही वेगळी भासते त्यांच्यातील अगदी लहान मुलापासून ते अज्जी पर्यंत ते सर्व कॅरेक्टर फेमस झाले आहेत. पण यातील मुख्य भूमिका आहे ती डॉक्टर अजित याची. तो जरी पेशानी डॉक्टर असला तरी मुळात तो डॉक्टर नाही ती जनतेची फसवणूक करत आहे.
पण जनतेला काय गोळी घेतली आणि आपण बरे झालो हाच डॉक्टर अनेकांना फसवत आहे आणि कधी कधी त्यांचा जीव घेत आहे तर बघुया या डॉक्टर बद्दल बरेच काही. ह्या मालिकेत डॉक्टर असणारा हा नायक अजितकुमार देव म्हणजेच किरण गायकवाड या नायकाने साकारली आहे.
या अभिनेत्याला आपण पहिल्या पासून ओळखतो आहोत. लागिर झालं जी या मालिकेतील भैय्या साहेब आठवत असेल तुम्हाला. त्या वेळी झी मराठी या चेंनेल साठी लागिर झालं जी साठी ऑडिशन होती. त्यातील मधील भैय्या सा किरण यांची खूप मेहनतीने निवड झाली. किरण चा जन्म हा पुण्यात झाला शिवाय त्याच शिक्षण ही पुण्यात झालं.
शाळेत असल्या पासून त्याला अक्टिंग ची आवड शिवाय त्याची शरीरयष्टी ही एखाद्या नायकासारखी आहे. त्याच्या घरात त्याची आई आणि बहीण आहे. लागिर झाली जीं ही मालिका संपली आणि नंतर किरण याने टोटल हुबलाक ही मालिका ही केली आहे. पण ही मालिका फक्त लॉक डाऊन पुरती होती.
त्यानंतर त्याला पुन्हा ब्रेक मिळाला. किरण गायकवाड यांनी कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना अत्यंत यशस्वी पणे भूमिका करण्याचं काम केले आहे आणि त्यांचं हे काम लोकांना आवडत ही आहे.
1 Comment