मनोरंजन

डॉक्टर अजित येणार एका नवीन भूमिकेत बघणार ना तुम्ही

डॉक्टर अजित म्हणजेच किरण गायकवाड सध्या खूप चर्चेत आहे. त्याचा अभिनय तर सर्वांनाच आवडला आहे. अगोदर त्याची भैया साहेब हे पात्र लोकांना खूप आवडले होते. त्यामुळे त्याने मालिकेत नकारात्मक भूमिका केली किंवा चांगली भूमिका केली तरी प्रेक्षकांना तो अवडणाराच यात शंका नाही. कारण त्याचा वेगळा असा एक चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

सध्या संपलेली मालिका देवमाणूस हिला प्रेक्षक मिस करताना दिसतात तसेच यातील त्याची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. पाहायला गेलात तर प्रत्येक कलाकाराने जीव ओतून काम करायला हवे तसेच त्याने केले आहे. पण देवमाणूस ही मालिका संपल्यानंतर लगेचच आठ दिवसांनी किरण ने पुन्हा शुट्टींगला सुरुवात केली आहे.

हा सर्वाचा आवडता डॉक्टर किरण गायकवाड सध्या एका नवीन भूमिकेसाठी सज्ज आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रेक्षकांसाठी ह्या संदर्भात पोस्ट शेअर केली आहे. एक विशिष्ट फोटो शेअर केलाय त्या मध्ये तो एका फौजीच्या वेशात दिसत आहे. आणि त्याच्यावर त्याने” समथिंग कुकिंग” असे लिहले आहे.फक्त आणि फक्त इतकतच त्याने शेअर केले आहे.

त्यामुळे पुढे सिनेमा करणार आहे की मालिका हे सांगितले नाही. तर आपल्याला वाट पाहावी लागेल नेमक हे काय आहे. पण नक्कीच यात त्याचा रोल काहीतरी नावीन्य घेऊन येणार आहे हे नक्की. बघुया आता तो आपल्यासाठी काय नवीन घेऊन येत आहे तुम्ही तयार आहात का किरणला या नवीन भूमिकेत बघायला.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *