हेल्थ

तुमचेही घुडघे दुखतात? मग हे घरघुती उपाय वाचा

गुडघे दुखणें म्हणजे विश्रांती करत असतांना, चालतांना किंवा दैनंदिन कृती करत असतांना गुडघ्याच्या सांध्यामध्ये जाणवणारी वेदना. बहुतांश वेळा, तिचे कारण तंतूच्या वाढीव अशक्ततेमुळे शेजारील तंतूंना झालेली हानी असे असते. या कारणाशिवाय, गुडघे दुखणें अपघातात्मक इजा किंवा गुडघ्याच्या सांध्याच्या अतिशय वापरामुळेही होऊ शकते. गुडघे दुखण्याचे निदान व्यक्तीच्या संपूर्ण वैद्यकीय इतिहास, रक्तचाचणी आणि क्षकिरण आणि अल्ट्रासोनोग्राफी यांसारख्या काही रेडिओलॉजिकल चाचणींच्या आधारे डॉक्टरांद्वारे सहज केले जाऊ शकते.मुळात गुडघे दुखी हा आजार वात प्रकृतीच्या लोकांमध्ये अधिक प्रमाणात जाणवतो असं म्हटलं जातं.  गुडघे दुखणें या उपचारानंतरही टिकून राहत असल्यास, शस्त्रक्रियेची गरज देखील पडू शकते. गुडघे दुखण्यावरील उपचारात प्रगती झपाट्याने होते, पण यामागील कारणाचे निदान डॉक्टरांना वेळेवर न झाल्यास, वेदनेत बिघाड किंवा गुडघ्याचा सांधा पूर्णपणें खराब होणें असे होऊ शकते.

कारणे – रस्त्यावरील एखादे अपघात किंवा कठोर प्रकारच्या व्यायामामुळे होणारी शारीरिक इजा गुडघ्याचा सांध्याभोवतीच्या मऊ तंतूची क्षती यामागील कारण असू शकते किंवा अशा इजेमुळे तेथील हाडांच्या ढाच्याला इजा घडवू शकते. अशा इजांमुळे गुडघे दुखणें सुरू होतात. खेळाडूंमध्ये, गुडघ्याचा सांध्याला समर्थन करणारी उशी फाटणें, जिला मेनिस्कल टिअर गुडघ्याचा सांध्यात संक्रमण झाल्यामुळे देखील गुडघेदुखी होऊ शकते

सहज करतायेण्यासारखे घरगुती उपाय – सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या वेदने आराम – देवदाराचा गरम लेप लावल्यास मांड्या गुडघे यात जखडलेले वाटत असेलतर मोकळे होते. गुडघ्यावरील बारीक नस दुखणे थांबते. अळशीच्या बीयाही हाडांना मजबूती देण्यास मदत करतात. लहान चमचा सूंठ पावडरमध्ये मोहरीचे तेल मिसळा.व ते दोन तीन वेळा लावत जा. अंड्यामध्येही मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. खासकरून अंड्याच्या पांढऱ्या भागात कॅल्शियम असते तर पिवळ्या भागात ड जीवनसत्त्व असते. पालक आणि हिरव्या पालेभाज्या खाव्यात. या भाज्यांमुळेही हाडं मजबूत होण्यास मदत होते. शंभरग्रँम खोबरेल तेल व २५ग्रँम कापूर पावडर उकळून ते थंड झाल्यावर रोज माँलीश करा.

ओव्याला मिक्सरमध्ये फिरवून फेस्ट करा ,ती खोबरेल तेल व सेंधव एकत्र करून लेप लावा फरक दिसतो. गुडघ्याच्या वाटीवर कणकेच्या पिठाचे आळे करुन त्यात कोंबट करुन तेल सोडत जा हे एरंडेल, खोबरेल, मोहरी यांचे ही चालेल. एक चमचा हळद पावडर, एक लहान चमचा पिठीसाखर, मध, आणि एक चुटकी चुना हे सर्व एकत्रित करून मसाज करा. कोरफडीचा गर आंबेहाळद,रक्तचंदन,हळद ,मीठ,एरंडेल तेल एकत्रित कालवून लेप द्या. लसूण पंचवीस ग्रँम मोहरीचे तेल शंभर ग्रँम उकळून ते लसूण काळी झाल्यावर काढा थंड झाल्यावर रोज लावा.

अश्वगंधा एक चमचा व सुंठ दोन चिमूटभर एकत्रितपणे प्यायल्यास आराम मिळतो. आवळा रस पाव कप ,गुळवेल काढा पाव कप,मध चार छोटे चमचे घालून प्या गुडघ्यात शक्ती स्फूर्ती येईल.गुडघ्यातील ओढ,आम कमी होईल. मध गरमकरुन गुडघ्याला लावल्यास व वरुन शेकल्यास छान रिलिफ मिळतो. विश्रांती घेणे आणि वेदना तीव्र करणारी कामं टाळणे, विशेषतः वजन पेलावी लागणारी कामं.

बर्फाचा वापर करणे. प्रथम, तो दर तासाला 15 मिनिटापर्यंत लावावा. पहिल्या दिवसानंतर, दिवसातून किमान चारवेळा बर्फ लावावा. आपला गुडघा शक्य तितका उंचावर ठेवा म्हणजे सूज कमी करता येईल. वेदना आणि सूज यांच्यासाठी औषध घ्या. गुडघ्यांच्या खाली किंवा मधे उशी ठेवून झोपावे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *