मनोरंजन

सध्या वायरल होत असलेली डान्सिंग शेतकऱ्याची मुलगी नक्की आहे तरी कोण?

ओ शेठ तुम्ही नादच केला थेट हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे. पण हे गाणं आल्यानंतर ह्या गाण्याबद्दल फारसे कुणाला माहीत नव्हते. पण सध्या प्रत्येकाच्या तोंडावर हे गाणं आहे, कारण ही तसच आहे. सध्या सोशल मीडियावर जे काय वायरल होते ते लगेच लोकांच्या आवडीचे होते.

आवडीचे म्हणण्या अगोदर ते त्यात वेगळं काही तरी लोकांना पाहायला मिळते त्यामुळे ते काही मिनिटातच व्हायरल होते. अनेक लोकांनी ह्या गाण्यावर आपापल्या परीने व्हिडिओ बनवून तुफान प्रसिध्दी मिळवली. ” ओ शेठ तुम्ही नादच केला शेठ” हे गाणं नाचून अकोल्याची ही छोटी मुलगी एक रात्रीत प्रसिद्ध झाली आहे.

ही मुलगी नक्की आहे तरी कोण? तर ही अकोल्यातील पिंपळगाव तालुक्यातील निपाणी या गावाची कृपा दीपक वाघचौरे. हिने या गाण्यावर डान्स करून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तिला डान्स करण्याची प्रचंड आवड आहे. दोन वर्षाची असल्यापासून तिला ही आवड निर्माण झाली आणि तिथपासून तिचे वडील तिला डान्स क्लासला नेतात.

Source Krupa Wakchaure social handle

ते ही 14 ते 16 किलो मिटरचा प्रवास करूनच. प्रत्येक गोष्टी मागे एक खूप मोठा संघर्ष केला असतो. आपल्याला नेहमी हसतमुख दिसणारा तिचा चेहरा खरंच लोकांना खूप जास्त भावला आहे. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन एवढे खरे वाटतात की सारख्या तिच्या व्हिडिओ पहावेसे वाटते. तसेच तिने अनेक डान्स प्रोग्रामही केलं आहेत. त्यात ही तिने अनेकदा पहिला नंबरही पटकावला आहे.

पाळण्यात असतानाच बाळाचे पाय दिसतात हे काही खोटे नाही. तिची ही आवड तिला अजून खूप पुढे नेईल कदाचित यापुढे ती आपल्याला टीव्हीवर ही दिसेल तर चला तिच्या या पुढच्या वाटचाली करता तिला शुभेछ्या देऊ या. तुम्ही तिचा डान्स व्हिडिओ पाहिला आहे का? कसं वाटलं नक्की सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *