मुळशी पॅटर्न सिनेमा आजवर आपण अनेकांनी पाहिला असेल, ह्यातील प्रत्येक पात्र आपल्या मनावर एक वेगळं राज्य करतं. ह्यातील यारो का यार, दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणजे गण्या तुम्हा आम्हाला माहितीच आहे. गण्या म्हणजे क्षितिष दाते लग्न बंधनात अडकला आहे.

ऐन लॉकडाऊनच्या दिवसात त्याने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ९ फेब्रुवारीच्या दिवशी त्याने आपल्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. लॉक डाऊन मुळे लग्न लांबणीवर जात होते. त्यामुळे कमी लोकांच्या सानिध्यात त्यांनी आपला लग्नसोहळा पार पाडला.
आपल्या आयुष्याची गाठ त्याने ऋचा आपटे सोबत बांधली आहे. ऋचा आपटे ही सुद्धा मराठी सिनेसृष्टीत काम करते. आपण अनेक मालिका, वेब सिरीज आणि नाटकामध्ये पाहिले असेलच. इडक ह्या सिनेमात सुद्धा ती संदीप पाठक सोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. दिल दोस्ती दुनियादारी ह्या झी मराठी मालिकेतून ती प्रकाशझोतात आली होती. सध्या ती सोनी मराठी वरील मालिकेत काम करत आहे.

क्षितिश आणि ऋचा हे खूप आधी पासून एकमेकांना ओळखतात. आधी छान मैत्री नंतर हळुवार फुलणाऱ्या प्रेमाला त्यांनी लग्नात रूपांतर करून चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. शिवराज वाईचर ह्याने आपल्या सोशल मीडिया वरून त्यांच्या लग्नाची माहिती चाहत्यांना दिली. त्यांच्या पुढील वाटचालीस पाटीलजी मीडिया कडून खूप साऱ्या शुभेच्छा.