किती तरी नवीन मालिका येतात आणि कितीतरी जातात पण ज्या मालिका खरंच प्रेक्षकांना आवडल्या त्यांचा रिमेक होतो. मग त्या वेगळ्या भाषेतील मालिका असल्या तरी त्यांची स्टोरी प्रेक्षकांना आवडली म्हणून त्या वेगळ्या भाषेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या जातात. अशीच एक मालिका स्टार प्रवाह वरती आली आहे “लग्नाची बेडी” असे त्या मालिकेचे नाव आहे.
पण ही मालिका स्टार प्लस या वाहिनीवरील “गुं है किसी के प्यार मे” या मालिकेचा रिमेक आहे. संकेत पाठक, सायली देवधर आणि रेवती लेले हे कलाकार तुम्हाला मुख्य भूमिकेत दिसतील. तर “गुं है किसी के प्यार मे” या हिंदी आयेशा सिंह, नील भट आणि ऐश्वर्या शर्मा हे प्रमुख कलाकार होते. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.
“लग्नाची बेडी” या मालिकेत डॉक्टर होण्याची स्वप्ने पाहत असणारी ही अभिनेत्री आणि तिच्या आयुष्यात आलेला पोलिस अधिकारी यांच्या घटनांवर आधारित ही मालिका आहे. पोलिस अधिकारीही संकेत पाठक हे राघव रत्नपारखी या भूमिकेत आहेत. हे दोन वर्षांनी कमबॅक करत आहेत. यागोदर सायली देवधर हिला तुम्ही “वैदेही” या मालिकेत पाहिले आहे.
याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री सुमुखी पेंडसे या त्यांची या मालिकेत रुक्मिणी रत्नपारखी ही भूमिका आहे. याशिवाय आई कुठे काय करते या मालिकेतील गौरीची आई म्हणून काम करणारी सुषमा मुरुडकर ही अभिनेत्री सुध्दा आहे. याशिवाय रसिका धामणकर, मीनल बाळ, गंधार खरपुडिकर हे सर्व कलाकार आहेत.
सोमवार ते शनिवार दुपारी एक वाजता ही मालिका लागते कोणी कोणी पाहिले कॉमेंट करून सांगा.