लाजाळू ही वनस्पती कुठेही उगवते. घराच्या कोपऱ्यावर, उकिरड्यावर, डोंगर, मातीच्या ढिगाऱ्यात बऱ्याच ठिकाणी ही वनस्पती आपल्याला उगवलेली पाहायला मिळते. आता ही लाजाळू ची वनस्पती कशी दिसते हा प्रश्न तुम्हाला पडला असेल? अगदी चिंचेच्या पानांना सारखी या झाडाची पाने असतात. पण चिंच इतके मोठे झाड होत नाही तर हीचा आकार मध्यम असतो.
ह्या झाडांची एक अजब गोष्ट आहे तू म्हणजे या झाडांच्या पाणाना हात लावल्यास ही पाने लगेच मिटतात. म्हणून कदाचित त्यांना लाजाळू हे नाव पडले असेल. कदाचित कोणत्या तरी स्पर्शाचा किंवा धोक्याचा इशारा त्यांना या मार्फत मिळत असावा. त्यानंतर स्पर्शाचा परिणाम जसं जसा कमी होतो तशी ती पाने पुन्हा व्यवस्थित होतात. ह्या झाडाला काटे असतात त्यामुळे हात लावताना थोड सांभाळून.

लाजाळू वनस्पतीचे फायदे
- लाजालू हे थंड गुणांनी समृध्द असून त्याच्या सेवनाने कफ आणि पित्त या आजारांवर गुणकारी आहे.
- तुम्हाला मूळव्याधीचा त्रास असेल तर तुम्ही याच्या पांनाची पावडर दुधासोबत घ्या.
- मुतखडा किंवा अन्य कोणतेही मुत्र विकार असतील तर तुम्ही याच्या मुळांचा काढा करून प्या.
- खोकला येत असेल तर या झाडाची पाने किंवा मुळ चाऊन खा आराम मिळतो.
- जखम झाली असेल आणि रक्त थांबत नसेल तर अशा वेळी या झाडाची पाने वाटून ही पेस्ट जखमेवर लावा रक्त थांबते.
अशी भरपूर झाडे वनस्पती आपल्या आजूबाजूला आहेत त्यांचा उपयोग आपल्याला माहीत नाही पण ह्या वनस्पती खरोखर खूप उपयोगी आहेत त्यामुळे त्या काढून फेकु नका त्यांचा उपयोग जाणून घा.
खर्च मुतखडा पडेल का
याणि सर
साईड इफेक्ट होतोका
मुतखडा पडेल का