क्रीडा

भारतीय हॉकी संघाने ह्या वर्षी शेवटचं गोल्ड मेडल जिंकल होतं

सध्या चालू असलेल्या ऑलिंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले आहे. हे पदक जिंकून भारतीय टीमने इतिहास रचला आहे. जवळ जवळ 41 वर्षांनी हे पदक पुन्हा भारतात आले आहे. म्हणजेच काय तर 1980 साली झालेल्या मास्को मधील ऑलिंपिक स्पर्धेत आपल्या भारतीय टीमने गोल्ड मेडल जींकल होत.

त्यावेळी भारतीय टीमचे कप्तान वासुदेवन भास्करम् हे होते. तेव्हा जो जोश निर्माण झाला अगदी तसेच काही आता सुद्धा ह्या संघाने करून दाखवले आहे. जवळ जवळ दीड वर्ष या टीमने ऑलिंपिक साठी तयारी केली होती. लॉकडाऊन सुरू झाल्याने अनेक समस्यांना सुद्धा त्यांना सामोरे जावे लागले पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि हीच मेहनत त्यांच्या पदरात पडली. सर्व भारतीयांची मान गर्वाने उंचावत त्यांनी हा विजय संपादित केला.

प्रत्येक टीमला जिंकल्यानंतर आनंद हा होत असतोच भारतीय टीम मधील कप्तान मनप्रीत सिंग यांनी सांगितले की ह्या ऑलिंपिक मध्ये खेळाडूंनी खूप मेहनत केली आहे. जर तुम्ही पदक आणि वरून येणाऱ्या प्रेशरचा विचार करून खेळाल तर तुम्ही कधीच चांगल खेळू शकणार नाही. सुरुवाती पासून ते शेवट पर्यंत मनावर कोणतेही दडपण न ठेवता खेळलो.

याबाबत टी चे कोच ग्रहण रिड हे म्हणतात की, शेवट पर्यंत टीम तणावाखाली होती पण तरीही मनावर ताबा ठेऊन टीम ने उत्तम खेळ खेळला. या भारतीय हॉकी टीम ने देशाला कांस्य पदक जिंकल्याबद्दल भारतीय राष्ट्रपती तसेच पंतप्रधान मोदींनी स्वतः कॉल करून यां संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *