चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा आणि कॉमेडीचा ठसा उमटवणारे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपला लाडका लक्षा सध्या तरी या जगात नाही पण त्यांचे चित्रपट अजूनही पहावेसे वाटतात. त्यांनी मराठी आणि हिंदी अशा भाषेमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या आताच्या पत्नी प्रिया बेर्डे यांच्याबद्दल तर सर्वांनाच माहित आहे पण त्यांची दोन लग्न झाली होती आणि पहिली पत्नी अजूनही तुम्हा माहीत नसेल.
लक्षा यांनी “कमाल माझ्या बायकोची” हा चित्रपट केला होता त्यात अभिनेत्री रुही ही सुधा काम करत होती. या अभिनेत्री ने मराठी सोबतच हिंदी भाषेत ही काम केले आहे. याशिवाय या चित्रपट मध्ये मराठी अभिनेत्री अलका कुबल या सुधा होत्या पण तरीही लक्षा यांचा जीव रुही वर बसला दोघांची शुट्टींग दरम्यान ओळख झाली.

त्यानंतर या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले शेवटी या दोघांनी लग्न केले पण त्यांचा संसार हा काही काळच टिकला आणि ते दोघे एकमेकांपासून वेगवेगळे झाले. एका मुलाखती मधे प्रिया बेर्डे या रुही बद्दल बोलताना असे म्हंटले आहे की, लक्ष्मीकांत यांच्या यशाचा सर्वात मोठा वाटा हा रुही यांना जातो कारण जेव्हा लक्ष्मीकांत प्रसिद्ध नव्हते तेव्हा रुही हिने त्यांना साथ दिली होती.
पण दोघेही वेगळे झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात प्रिया बेर्डे आली तिच्यासोबत त्यांनी लग्न केले त्यांना आता दोन मुले आहेत मुलगा अभिनय आणि मुलगी स्वानंदी.