हेल्थ

लिंबाच्या सालीचे हे आहेत अगणित फायदे त्यामुळे फेकून न देता उपयोगात आणा

लिंबू तर आपल्या अनेक उपयोगात येतात. सरबत किंवा अनेक भाजीत काहीना पिळून खायला आवडते पण त्याचा उपयोग झाल्यावर त्याच्या साली आपण फेकून देतो. पण आता आपण बघुया याचे काही उपयोग ज्यामुळे तुम्ही साल ही फेकून नाही देऊ शकणार. लिंबाच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, तसेच व्हिटॅमिन ए, फायबर यांसारखे भरपूर पोषक घटक असतात.

लिंबाच्या सालीत व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणत असल्यामुळे तुमची हाडे आणि दात मजबूत होतात. शिवाय व्हिटॅमिन सी मुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते. लिंबाच्या सालित हे minarals असतात त्यामुळे त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. शिवाय पोटाच्या अनेक आजारांपासून सुटका मिळते.

याशिवाय जेव्हा तुम्ही कुकर मध्ये वरण भात लावता तेव्हा कुकर आतून काळे पडते, अशा वेळी कुकर लावताना पाण्यात एक लिंबुची साल टाकावी कुकर अतून पांढरा शुभ्र होतो. फ्रीज मध्ये तर वास येत असेल तर त्यात ४,५ साली ठेवा वास येणार नाही.

लिंबाच्या साली उन्हात किंवा मायक्रोवेव्ह मध्ये वाळवून त्याची पावडर करा आणि ही पावडर तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. लिंबाची साल तुम्ही अंघोळीच्या पाण्यात ही टाकू शकता शरीरावरील घान आणि मळ निघून जाण्यास मदत होते. तसेच या सालि बारीक कापून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या त्यात पाण्यात टाकून उकळवून घ्या ते पाणी गाळून त्यात चार पाच थेंब डिश वाशर टाका याचा उपयोग तुम्ही घरातील फर्निचर किंवा अनेक वस्तू साफ करण्यासाठी करू शकता.

गॅसचा लाइटर चिकट आणि मळलेला झालेला असतो तर लिंबाची साल त्याच्यावरून घासायची आणि पुसून काढायची लाइटर साफ निघते. त्याचप्रमाणे तुम्ही घरातील तांब्याची भांडी ही सुद्धा या सालीने घासू शकता. या साली लिंबू वापरून झाल्यावर टाकून न देता एका डब्यात फ्रीज मध्ये ठेऊन द्या मग त्याचा उपयोग करा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *