विचारधारा

अच्छा म्हणून लिंबू आणि मिरची टांगतात

लिंबू मिरची

आपल्या कडे फार पूर्वीपासूनच लिंबू आणि मिरची एकत्रित ओवून ते दर शनिवारी आपल्या घराच्या दरवाजात किंवा कोणी आपल्या गाडीला लावतात. यावर त्याच्या प्रतिक्रिया काय असतील तर आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागू नये किंवा गाडीला ही वाईट नजर लागू नये त्याच्यापासून संरक्षण व्हावे. शिवाय काही छोटी छोटी मुलेही, बाया या सुध्दा सिग्नलवर लिंबू आणि मिरचीचे हे तयार केलेलं वस्तू विकताना दिसतात.

त्यांची किंमत कोणी पाच रुपयाला देते तर कोणी दहा रुपयाला. पण याच पैकी बहुतेक जणांना हे का टांगतात हे सुध्दा माहीत नसेल. आता खरं शास्त्रीय कारण असे आहे की हा लिंबू आणि मिरची आपण घराच्या दरवाजात लावल्यास बाहेरील कीटक आणि किडे जे आपल्याला नेहमी त्रास देत असतात ते हे लावल्याने घरात येत नाहीत त्याच्यावर नैसर्गिक रित्या प्रतिकार होतो.

म्हणजेच काय तर याचा अर्थ लिंबुची चव ही आंबट असते इतकी की त्या वासाने किडे आणि कीटक, मच्छर वासानेच लांबून पळून जातात. तसेच मिरची ही वासाला तिखट असते आणि त्यात कॅप सायनस नावाचा एक केमिकल युक्त पदार्थ असतो.त्याच्या ही वासाने कीटक लांब पाळतात.

लिंबू मिरची
Source Social Media

जवळ जवळ आठ दिवसांनी हे दोन्ही पदार्थ सुकले जातात वाळले जातात म्हणून त्यांचा परिणाम ही कमी होती त्यासाठी लगेच आठ दिवसांनी नवीन लिंबू मिरची टांगले जाते. आठ दिवसात लिंबू व मिरची सुखून जातात व त्यांचा रासायनिक प्रभाव कमी होतो . म्हणून आठ दिवसात एकदा फ्रेश लिंबू व मिरची लावल्याने फायदा होतो.

तरीही लिंबू मिरची लावणे हे त्याच्या त्याच्या मनावर आहे कोणीही कोणत्याही कारणाने लावा फक्त घरातील वाईट कीटक का होईना किंवा शक्ती का होईना बाहेर तर जाणारच आहेत ना. तुम्हाला ह्या मागचे हे कारण माहिती होत का? आम्हाला नक्की सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *