मनोरंजन

सुख म्हणजे नक्की काय असते यातील शालिनी खऱ्या आयुष्यात बघा कशी आहे

स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका लोकांनां प्रचंड आवडते. त्यातील प्रत्येक कॅरेक्टर हे प्रक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. ते कॅरेक्टर भलेही नकारात्मक असो म्हणजेच शालिनी होय. या मालिकेतील शालिनी ही घरातील मोठी सून पण घरात कारस्थान करण्यात तिचाच हात असतो अशी ही लबाड, कट कारस्थान करणारी सून लोकांच्या प्रचंड पसंतीस उतरली आहे. पण ही शालिनी खऱ्या आयुष्यात नेमकी कशी आहे ते आपण पाहूया.

ही मराठी अभिनेत्री माधवी नेमकर आहे या अभिनेत्रीचा जन्म पुण्यात झाला आहे. तिने वयाची ३७ वर्ष ओलांडली आहेत तरीही ती अजूनही खूप सुंदर तरुण दिसत आहे. २००७ मध्ये तिने आपल्या या सुस्ट्रीत पदार्पण केले होते. गाणे तुमचे आमचे या शो मध्ये ती निवेदिका म्हणून आली होती.

तसेच मराठी चित्रपट मध्येही ती आपल्याला दिसून आली आहे संघर्ष, नवरा माझा भवरा, सगळ करून भागल, घावधाव, बायकोच्या नकळत तसेच महारथी, गेट वेल सून या नाटकांमध्ये ती दिसली तसेच मराठी मालिका स्वप्नांच्या पलीकडले, जावई विकत घेणे आहे, हम तो तेरे आशिक है,

२०१० ला तीच लग्न विक्रांत कुलकर्णी याच्यासोबत झाले आहे. तसेच त्यांना एक सहा वर्षाचा मुलगा ही आहे. त्याचे नाव रूबेन आहे. माधवीची स्लिम बॉडी आणि फिटनेस बघून तुम्हालाही वाटत असेल की तिच्या फिटनेस बाबत किती सतर्क आहे ती नियमित पणे त्यासाठी योगा करते. तसेच तिला नृत्य करण्याची ही खूप आवड आहे. त्यात तिने कथकचे शिक्षण घेतले आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *