बातमी

या योजेअंतर्गत २.५० लाखापर्यंत मोफत उपचार, पहा हॉस्पिटलची यादी

प्रत्येकजण कधी ना कधी आजारी पडतोच मग हा आजार छोटा असो किंवा मोठा, ह्या आजाराला आपल्याला सामोरे जावे लागते. पण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नसते की प्रायव्हेट हॉस्पिटलचे गडगंज बिल भरू शकतील. त्यामुळे अनेक लोक आपले आजार अंगावर काढतात. आणि ह्याचे दुष्परिणाम त्यांना काही काळानंतर भोगावे लागतात.

पण सरकारी हॉस्पिटल किंवा इतर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये अनेक अशा सरकारी योजना चालू असतात ज्याने आपल्या आजावरावर मोफत उपचार होऊ शकतात. आणि एवढेच काय तर अनेक मोठ मोठे ऑपरेशन सुद्धा ह्याच्यात केले जातात. फक्त लोकांना माहीत नसते एवढेच. अशाच आज एका योजनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आम्ही ज्या योजनेबद्दल तुम्हाला सांगणार आहोत त्यात तुम्हाला २ लाख ५० हजारापर्यंत मोफत उपचार मिळू शकतो. ह्या योजनेचे नाव महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे. या योजने अंतर्गत अनेक आजारावर मोफत उपचार केला जातो. फक्त काही लोकांना ह्या गोष्टीची कल्पना नाही एवढेच.

ही योजना तुम्हाला प्रत्येक हॉस्पिटल मध्ये मिळत नाही. राज्यातील काही ठराविक रुग्णालये ह्या योजने अंतर्गत येतात. तुमच्या राज्यातील कोणते हॉस्पिटल ह्या योजनेत आहे ह्या साठी तुम्ही आम्हाला इनबॉक्स मध्ये मेसेज करू शकता. तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटलचे नाव तुम्हाला देण्यात येईल. गुगलच्या पॉलिसी नुसार इथे आम्ही लिंक देऊ शकत नाही त्याबद्दल क्षमस्व पण आमच्या पेजवर मेसेज करा तुम्हाला आमची टीम लिंक प्रदान करेल.

प्रत्येकाने ह्या योजनेचे लाभ घ्यावा हीच सर्वांना विनंती आहे. ह्यासाठी फक्त तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड झेरॉक्स कॉपी त्या हॉस्पिटल मध्ये द्यावी लागते. एका आठवड्यात तुमचं नाव ह्या योजनेत लागू होतं. फक्त काही नियम आणि अटी आहेत त्या तुम्हाला हॉस्पिटल मध्ये असणारी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची टीम सांगू शकतात.

Previous ArticleNext Article

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *