विचारधारा

महिला आणि दीन

महिला दीन

महिला दिनाच्या निमित्ताने आणखी एक गोष्ट आठवली. साधारण एक महिन्यांपूर्वी एका मुलीच्या नावाने फ्रेंड request आली. मीही ऍक्सेप्ट केली. अर्थात ते प्रायव्हेट ac नसल्याने त्यावर प्रमोशन होत असतात. म्हणून मी ही केली आपली ऍकसेप्ट रितू अस काहीश्या नावाने ते ac होत एका गोड मुलीचा फोटो देखील होता. त्याच दिवशी त्या नंबर वरून एक मेसेज आला… I LoVE YOU.

आता हे वाचून मला खरंच हसायला आली. गमतीने मीही हसण्याचे इमोजी पाठवले. इतकंच काय ते प्राथमिक संभाषण. दुसऱ्याच वाक्याला त्या महाशयांनी आपली लायकी दाखवली. अत्यंत किळसवाण्या शब्दांत बोलु लागल्यावर फारच राग आला. करणार तरी काय होते. रिपोर्ट करून ब्लॉक केलं, यावर आणखी काय ..?? कित्येक जणी हे सहन करतात.

न विचारता अनोळखी नंबर वरून ac वरून देखील अश्लील मसेज अनेकदा मिळतात. हेच तथाकथित पुरुष मुलींच्या नावाने फेक अकाऊंट बनवून नको नको त्या भाषेत बोलतात. घाणेरड्या क्लीप पाठवतात. मुली ब्लॉक करून विषय तिथेच संपवतात. मी ज्या दिवशी हे घडलं त्यानंतर सरळ कागदावर उतरवत आहे. ना कोणाला संगीतल ना कोणाला याची कल्पना दिली. का तर कोणी मलाच बोलेल अशी भीती वाटली मला.

तू अनोळखी लोकांच्या रिक्वेस्ट accept करायचीच कशाला. अनोळखी लोकांशी बोलायचं नाही. तू रिप्लायच कशाला दिला वगैरे वगैरे.. मनात कसली भीती साठवून मनात दडवून ठेवतात या स्रिया हे अनेकदा त्यांचं त्यांना देखील माहीत नसतं. कित्येक वासनेचे पुजारी हवे तसे हवे त्या मार्गाने फिरत असतात. अनेक पद्धतीने मोहाला बाळी पडलेल्या अनके मुली. स्त्रिया. मूग गिळून गप्प आहेत. का तर यामागे देखील एक भीती सतत पिच्छा पुरवत असते.

लोक काय म्हणतील. आपलीच बदनामी होईल. त्यापेक्षा हे इथेच संपवू. हा विषय एकटा नाही. आधी बहीण म्हणून आपुलकी दाखवणारे मग हळूच प्रपोज करणारे, आधी मी कसा जगाहून वेगळा आहे अस दाखवून लग्न करू आपण अशा आमिषाने अल्पवयीन मुलींना फूस लावणारे. कौटुंबिक हिंसाचार करून बाहेर ताठ मानेने फिरणारे… अरे दहाच्याच्या आत घरात ये अस मुलींना सांगणाऱ्या समजला जेव्हा आपण तिला लवकर घरी बोलावतो तसच मुलाला देखील बोलवा ना.

मुलींचा आदर हा मनातून यायला हवा. जिजाऊंच्या संस्कारांना जीवापाड जपणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात देखील अत्याचाऱ्याच्या हजारो घटना नोंदवल्या जाव्यात. मुलींनो सक्षम व्हा अस सांगणाऱ्याना अगदी पाच वर्षांच्या कोवळ्या जीवाला देखील सोडत नाही ओ तर सक्षमतेच्या ” सक्षम” चा अर्थ समजायच्या आत जर हे घडत असेल तर यावर उपाय काय..??

मग तुम्हीच सांगा त्या एका दिवशीच्या जल्लोषाने कितीसा फरक पडनार असतो ते त्या महातम्यांनाच माहीत ज्यांच्या साठी तो एक दिवस पाळतो. मनोभावे पूजा करतो. किमान थोडे जरी दर्शन पाळले तरी एकही मुलगी रात्री घराबाहेर निघायला घाबरणार नाही. थोडा राग येईल पण आपला पुरुषार्थ तिथे दाखवा. जिथे खरंच त्याची गरज आहे… शेवटी महत्त्वाचे.

महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अजून बरंच सहन करायची ताकत ठेवा. अजून पुढेही सहनच करत राहावं लागणार आहे. कारण आपला कायदा आणी समाज बदलायला अजून खूप काळ जाणार आहे. लेखिका स्वीटी सुभाष महाले.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *