मनोरंजन

ह्या मुलीची होत आहे सध्या सर्वत्र चर्चा

सोशल मीडियावर कधी काय वायरल होईल सांगू शकत नाही. क्षणार्धात कुणीही प्रचलित होऊ शकतो. महिमा चौधरी हिला आपण सर्वच जाणून आहोत. तिच्या अभिनयाने अनेक सिनेमे तिने हिट केले आहेत. एकेकाळी ती तरुणाईचा क्रश होती. पण सध्या ती सिने सृष्टीपासून लांब आहे. काहीच दिवसांपूर्वी ती तिच्या फॅमिली डॉक्टरच्या क्लिनिक बाहेर दिसली.

पण यावेळी तिच्या सोबत असणाऱ्या तिच्या मुलीने सर्वांचे लक्ष ओढून घेतले. यावेळी काढलेले मायलेकीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. अनेक लोक तिला बाहुली सारखी दिसत आहे असे म्हणत आहेत. एखादी बाहुली समोर आहे असाच भास होतोय, अशा चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

महिमा चौधरी यांच्या मुलीचे नाव एरियाना असे आहे. २००६ मध्ये व्यावसायिक बॉबी मुखर्जी लगीनगाठ बांधली होती. त्यांचीच एरियाना ही कन्या. पुढे जाऊन २०१३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आणि आता मुलगी महिमा यांच्यासोबत राहते. तिच्या मुलीचे हे सौंदर्य पाहून युवा पिढी घायाळ झाले आहेत. नक्कीच पुढे जाऊन आपण तिला सिनेमात पाहू ह्यात काही शंका नाही.

Source Mahima Chaudhary Social Handle

महिमाने अनेक सिनेमात कामं केली आहेत. पण ती सिंगल मदर असल्याने तिने आपल्या मुलीसाठी बॉलीवूडला राम राम ठोकला होता. तिने आपला सर्व वेळ एरियाना दिला आणि तिच्या संगोपनात स्वतःला गुंतवून घेतलं. त्यामुळे तिने सर्वांपासून आपल्या मुलीला लांब ठेवलं होतं. पण काहीच महिन्यापूर्वी तिने आपल्या मुलीची ओळख सर्वांना करून दिली.

एरियाना या आधी तुम्ही पाहिले होते का? पाहिल्यावर तुमची पहिली रिअँक्शन काय होती हे आम्हाला नक्की कळवा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *