हेल्थ

काही मिनिटातच करा हा वाटण वापरून भाजी, वाटण एकदाच बनवून ठेवा.

वाटण कसे करावे

सध्याच्या जीवनात अनेक स्त्रिया कामाला जात असतात त्यामुळे त्यांच्यासाठी काही वेळातच स्वयंपाक होणे गरजेचे असते. तसेच काही पुरुष ही बाहेर शहरांमधे एकटे राहून जॉब करत असतात त्यांनाही स्वतःचा स्वयंपाक स्वतचं करावा लागतो. अशा वेळी त्याच्यासाठी काही वेळात भाजी होण्यासाठी एक वाटण तयार केले आहे. ते सुट्टीच्या दिवशी बनवून ठेवा आणि संपूर्ण आठवडा हेच वापरून भाजी तयार करा.

हे वाटण कसे करावे – सहा कांदे मधून चिरा पाडून गॅसवर अक्खेच भाजून घ्या. त्याचबरोबर खोबऱ्याच्या 2 वाट्या  गॅसवर थोड्या भाजून घ्या व त्याचे बारीक काप करून घ्या. दोन इंच आले कापून भाजून घ्या, दोन लसणाच्या गड्डी सोलून भाजून घ्या. एक वाटी धने मंद गॅसवर भाजून घ्या. साफ केलेली कोथिंबीर, तुम्हाला हवे असल्यास अख्खा गरम मसाला तेज पत्ता 4, लवंग6, मिरी 6, दालचिनी दोन इंच, तव्यावर मंद गॅसवर भाजून घ्या. आता सर्व वाटण पाणी न टाकता वाटून घ्या.

धने आणि गरम मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर कांदे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्या ते बारीक होन्यासाठी त्यात मीठ घाला याशिवाय मीठ हे वाटण टिकवण्याचे काम ही करते. नंतर खोबर, आणि शेवटी लसूण, आले आणि कोथिंबीर वाटून घ्या हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.

हे वाटण फ्रीजमध्ये ठेवा, पहिल्यांदा तेलात फोडणीला थोडे एक किंवा दोन चमचे वाटण टाका. तुम्हाला आमटी किती घट्ट हवी तेवढे वाटण घ्या. मग तेलात वाटण शिजेपर्यंत म्हणजे वाटण तेल सोडेपर्यंत शिजवा मग भाजी टाका. हवे तेवढे पाणी टाका. वाटल्यास थोडे गरम मसाला टाका. हे वाटण फक्त कांदा, खोबरे या दोनच वस्तू वापरून ही करू शकता.

एकदा हे वाटण घरात नक्कीच करून पहा. आणि आम्हाला नक्की सांगा तुमचा प्रयत्न कसा होता.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *