मनोरंजन

माझा होशील ना मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ?

अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे “माझा होशील ना” सध्या तरी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशी माहिती आली आहे. खरं पाहायला गेलात तर या मालिकेचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. त्यामुळे कदाचित प्रेक्षकांना यात जास्त रस राहिला नाही. त्यामुळे सध्या तरी ही मालिका एका एक्स्प्रेस सारखी पुढे पुढे धावत चालली आहे.

या मालिकेतील बहुतेक अभिनेते हे ज्येष्ठ तर आहेतच शिवाय अनुभवी ही आहेत. आजोबा अच्युत पोतदार तसेच मामा विद्याधर जोशी, सुनील तायडे, विनय येडेकर,निखिल रत्नपारखी आणि अभिनेता विराजस कुलकर्णी अभिनेत्री गौतमी देशपांडे यांची भूमिका उत्तम आहेच कलाकार ही छानच आहे पण तरीही ही मालिका हळू हळू लोकांच्या मनातून ओसरती होऊ लागली आहे. प्रसंगाचा कुठेही ताळमेळ नाही. याला कारण कदाचित कथेचे कथानक असेल.

“माझा होशील ना” ही मालिका संपल्यावर त्या जागी कोणती मालिका हा प्रश्न सर्वानाच पडला असेल तर या जागी सुरू होणार आहे. “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” ही मालिका चालू होणार आहे. ही मालिका झी मराठीवर 30 ऑगस्ट पासून रात्री 9 वाजता चालू होणार आहे. या मालिकेत अमृता पवार ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहे.

पहिल्या प्रोमो मध्ये ती मॉडर्न अशी दाखवली आहे शिवाय ती एका लिस्ट मध्ये नातेवाइकांची नाव पाठ करताना दिसत आहे. अर्थात पुढच्या आयुष्यात येणाऱ्या संसाराची तयारी करताना ती दिसत आहे. ही अभिनेत्री स्वराज्य जननी जिजामाता मध्ये दिसली होती तर ललित 205, जिगरबाज मध्ये तिने काम केले आहे.

ह्याच मालिकेत तुमचा आमचा सर्वांचा लाडका राना दादा म्हणजे हार्दिक जोशी पुन्हा एकदा झी वाहिनीवर मालिकेत काम करत आहे. ह्या मालिकेचा प्लॉट हा जॉइंट कुटुंब पद्धतीवर आधारलेला आहे. हा विषय तसा नवीन नाही पण मालिकेत काय नवीन दाखवतात ह्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलं.

पाहायला गेलात तर आत्ताच सई आणि आदित्य या दोघांचे लग्न पार पडले पण लग्न झाल्यापासून संसार हवा तसा नीटसा झालच नाही. शिवाय नवीन मालिका “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” ही “माझा होशील ना च्या वेळेला चालू होणार आहे. तुम्हाला काय वाटते ही मलिका बंद व्हायला हवी का नको कमेंट करून सांगा.

Previous ArticleNext Article

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *