आज आई कुठे काय करते” या मालिकेचे ६०० भाग पूर्ण झाले आहेत, यातील सर्वच पात्रांचे काम उत्तम आहे. पण एक असे पात्र आहे त्यांचा प्रेक्षकांना खरोखर खूप राग येतो, म्हणजे जितके एपिसोड झालेत तितका चाहत्यांचा तिरस्कार या पात्राला भोगावा लागला आहे. कारण जरी हे खरं खरं नसलं तरी प्रेक्षक मालिका बघताना त्यात समरस होतात. त्यांना त्यातील पात्र आपलीशी वाटतात आणि म्हणून जो सकारात्मक काम करतो तो नेहमीच प्रेक्षकांना आवडतो शिवाय नकारात्मक भूमिका करणाऱ्याला शिव्या घातल्या जातात.
अनिरुद्ध म्हणजे मिलिंद गवळी यांनी ही एक पोस्ट आपल्या अकाऊंटवर शेअर केली आहे ते म्हणतात “हे ६०० एपिसोड मी फक्त प्रेक्षकांच्या शिव्या खाल्ल्या आहेत. हे चाहते जितके अरुंधती वरती प्रेम करतात तितकेच माझा तिरस्कार करतात, हा तिरस्कार आणि शिवाय पाहून मला ही आनंद होत नाही दुःखच होत. मलाही दुःख होते जेव्हा मी अरुंधती सोबत असले सीन करतो पण मी नाही तर कोणाला तरी ही भूमिका करावी लागणारच ना? शिवाय मी जरी ही भूमिका केली तरी खरोखर असा मी नाही आहे”.
चित्रपट मध्ये खलनायकाची भूमिका करणारे ही खऱ्या दुनियेत अतिशय गुणी आणि निर्मळ स्वच्छ मनाचे असतात तसाच मी आहे. याशिवाय त्यातील काही पात्रे ही सकारात्मक आहे. म्हणजे आई वडील सोबत राहणे, मुलांच्या भवितव्याचा विचार करणे, आपल्या माणसांसोबत राहणे, चूक कबूल करणे, घर चालवण्यासाठी कष्ट या सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत.
मिलिंद गवळी याअगोदर बालकलाकार म्हणून ही त्याने काम केले आहे. तस बघायला गेलात तर त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षापासून या फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केले होते. नाशिक मध्ये जन्म झालेल्या या कलाकाराने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यांचे बालपण हे मुंबई मध्ये गेले.
त्यांचे वडील पोलीस खात्यात कामाला होते. मिलिंद गवळी यांचा जन्म नाशिक मध्ये झाला पण संपूर्ण बालपण आणि शिक्षण मुंबई मध्ये गेले. शिवाय त्यांच्या पत्नीचे नाव दीपा गवळी असे आहे. त्यांच्या मुलीचे नाव मिथिला गवळी आहे तिचे लग्न ही झाले आहे. कॉलेजमधे असल्यापासून त्यांना सिनेमा पहायची आवड होती. एकदा ते हम बच्चे हिंदुस्तान के सिनेमाचं शूटिंग चालू असताना मेन रोल करणारा अभिनेता गैरहजर असल्यामुळे हा रोल करण्याची संधी मिलिंद यांना मिळाली.