मनोरंजन

१३ वर्षापूर्वी मिलिंद गवळी आणि शंतनु मोघे ह्यांनी ह्या सिनेमात केलं होतं एकत्र काम

तुम्हाला माहीतच असेल सध्या मिलिंद गवळी आणि शंतनु मोघे हे दोघे “आई कुठे काय करते” या मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर करतनाना दिसत आहेत. पण खर तर याअगोदर ही या दोघांनी एकत्र काम केले आहे. “हळद तुझी कुंकू माझं” या मराठी चित्रपट मध्ये हे दोघे एकत्र आले होते. शंतनु हा तेव्हा नवखा होता याच चित्रपटात मधून त्याने चित्रपट सृष्टीत पाहिले पदार्पण केले होते.

पण तरीही शंतनु यांचे वडील हे एक उत्तम कलाकार असल्याने तो अभिनयाच्या बाबतीत उत्तमच आहे. शिवाय माणूस म्हणूनही त्याच्यातील गुण हे छानच आहेत. मधल्या काळात दोघांची भेट झालीच नाही पण मग तब्बल 13 वर्षांनी या मालिकेच्या भूमिकेबद्दल शंतनुचे पदार्पण झाले आणि मिलिंद यांचा आनंद द्विगुणित झाला. शंतनु याबद्दल बोलताना म्हणतात की, मिलिंद गवळी यांची इतक्या वर्षांनी भेट होणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

Source Shantanu Moghe Social media

मिलिंद गवळी यांची जरी या मालिकेत नकारात्मक भूमिका असली तरी खऱ्या आयुष्यात हा माणूस खूप प्रेमळ आहे. शिवाय मनाचा मोठेपणा ही त्यांच्याकडे आहे. सध्या ही दोघे आई कुठे काय करते या मालिकेत दोन भावांची भूमिका करत आहेत. या मालिकेत ही ते खूप वर्षांनी एकत्र आलेत हे दाखवले आहे. पण त्यांच्यातील वाद संपलेले नाहीत.

बघुया यापुढे जाऊन यांचे एकमेकांबद्दलचे वाद मिटतील का, अरुंधतीचे पुढे काय होईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पुढे जाऊन मिळतीलच.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *