आपण जरी काळया मिरीचा वापर लाल तिखट आणि हिरव्या मिरची प्रमाणे रोज करत नाही पण या काळया मिरीचे महत्त्व जाणून घेतले तर या काळया मिरीचा तुम्ही आपल्या आहारात रोज वापर कराल. या काळया मिरी मध्ये बऱ्याच प्रकारची खनिजे असतात शिवाय या मध्ये अनेक प्रकारची व्हिटॅमिन सी असतात. ही मिरी तशी उष्ण असतेच शिवाय चवीला तिखट असते.
मिरी पावडरच तुम्ही लिंबू सरबतात सुद्धा उपयोग करू शकता. काळी मिरी ही जेवणात वापरल्याने तुमची पचनशक्ती वाढते. याशिवाय पोटाचे आजार कमी होतात म्हणजेच अपचन, असिडिटी, गॅस, पोट फुगणे इत्यादी आजारांवर मिरी हा चांगला ऊ पाय आहे.
तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल आणि काही केल्या रक्त थांबत नसेल तर त्या जखमेवर मिरपूड टाकावी. शिवाय जखम ही लवकर भरली जाते मीरी मध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक हे गुण आहेत त्यामुळे जखमेवर उत्कृष्ट काम करते.
तुम्हाला जर भूक लागत नसेल तर अशा वेळी काळी मिरी खाल्याने भूक चांगली लागते. काळी मिरी ही तिखट असते यामुळे त्याच्यासोबत गूळ खावे. कॅन्सर या आजारावर ही काळी मिरी चे सेवन उपयोगात आहे. ही काळी मिरी खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सर सारख्या आजाराशी लढण्यास उपयोगी आहे.
काळी मिरी खाल्ल्याने पोटात जे जंत होतात त्यांचा नाश होतो. तुम्हाला जर तुमचे वाढलेले वजन कमी करायचे असायचे असेल तर यावर ही काळी मिरी हा उत्तम उपाय आहे. कमी न होणारी चरबी हळू हळू वितळू लागते. काळी मिरी ही सर्दी आणि खोकल्यावर अत्यंत गुणकारी आहे नाक चोंडले असेल तर यावर ही काळीमिरी गुणकारी आहे.
मिरी मुळे त्वाचेसंबधी आजार ही दूर पळून जातात विशेषत चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होतात. ताप येत असेल तर यावर काळी मिरी उपयोगी आहे त्यासाठी काळया मिरीचा काढा करून पिणे. पाहिलेत मिरी किती उपयोगी आहे तुमच्यासाठी. मग यापुढे मिरी चा वापर तुमच्या दैनंदिन आहारात करायला विसरू नका.