मनोरंजन

रितेश देशमुख होणार गरोदर, पहा काय आहे भानगड

“मिस्टर मम्मी” या येणाऱ्या सिनेमात तुम्हाला रितेश एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे रितेश देशमुख वेगवेगळ्या भूमिका करणारा अभिनेता असला तरी त्याची कॉमेडी उत्तम असते. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख यांनी केले आहे. याशिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात त्याची बायको जेनेलिया ही सुद्धा असणार आहे शिवाय जिया शंकर ही सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कुटुंबासोबत बघण्यासाठी एक नवीन विषय आणला आहे. या सिनेमा मध्ये फुल कॉमेडी असणार आहे. त्याचबरोबर ड्रामा ही असणार आहे. लग्नाच्या अगोदर ही जोडी पहिल्या चित्रपट मध्ये “तुझे मेरी कसम” यात दिसली होती. त्यानंतर मस्ती, तेरे नाल लव हो गया है चित्रपट केले आहे. त्यानंतर आता ते अजून एक मराठी चित्रपट करत आहेत त्याचे नाव आहे “वेद”. त्यात ही तुम्हाला हीच जोडी पाहायला मिळेल.

या सिनेमाच्या पोस्टर दोघांनी आपल्या सोशल मीडियाची अकाऊंट वर शेअर केले आहे त्यात रितेश स्वतः गरोदर आहे आणि त्याची बायको सुद्धा. पण पूर्ण स्टोरी काय आहे हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर वायरल झालं आहे. बऱ्याच वर्षांनी रितेश आणि जिनीलिया एकत्र काम करताना आपल्याला दिसणार आहेत. त्यात चित्रपटाचा विषय कॉमेडी आहे म्हटल्यावर एक परफेक्ट फॅमिली सिनेमा असेल यात काही वाद नाही.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *