मनोरंजन

Mohit Raina Wedding: ‘देवों के देव महादेव’ अभिनेता मोहित रैनाने केलं लग्न

आज सर्व एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना बॉलीवूड मधून मात्र एका कलाकाराच्या लग्नाचे फोटो वायरल झाले आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून देवों के देव महादेव म्हणजेच मोहित रैना आहे. आजच त्याने आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट करत सर्वांना सुखद धक्का दिला.

Source Mohit Raina Social Handle

मोहित ने आदिती सोबत आपल्या आयुष्याची गाठ बांधली आहे. पण ही आदिती नक्की कोण आहे याबाबत अजून खुलासा झाला नाहीये. मोहित आणि आदिती मागील अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. अखेर त्यांनी दोघांचे एक होत आज आपल्याला चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

देवों के देव महादेव मालिका जेव्हा चालू होती तेव्हा ती पाहून प्रियांका चोप्राची आई म्हणाली होती की मला माझ्या प्रियांका साठी मोहित रैना नवरा म्हणून मला आवडेल. त्यांच्या या विधानाने तेव्हा खळबळ माजली होती.

मोहित ने अनेक हिंदी सिरीयल मधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यांनतर त्याने हिंदी सिनेमात पदार्पण करून आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. खास करून उरी आणि आताच प्रदर्शित झालेला शिद्दत सिनेमात त्याचा अभिनय लोकांना खूप जास्त आवडला.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *