संग्रह

अबब जगातली सर्वात क्रूर शिक्षा ऐकताना सुद्धा अंगावर काटा येतो

गुन्हेगारी ही काही नवीन नाही अगदी पूरातन काळापासून चालत आलेली ही गोष्ट वेळेनुसार त्यात कायद्यांची भर पडली आणि कुठेतरी यावर वचक बसवण्याचा प्रयत्न आज देखील चालू आहे. मात्र एखाद्या गुन्ह्याची किती भयानक शिक्षा देता येऊ शकते याविषयी विचार केला तर आपण कोणत्या पातळी पर्यंत विचार करू शकतो.? अर्थातच हिंसा ही प्रत्येकालाच नको असते.

मात्र एका अशाच क्रूर शासकाने आपल्या हयातीत एका भयानक शिक्षेची तरतूद केली होति जी एकूण सुद्धा अंगावर काटा उभा राहील. अक्रॅगस व सिसिलीचा जुलमी राजा फालारिस यांच्या राज्यात ते एक क्रूर हुकूमशहा म्हणून कुख्यात होते. याच राज्यात एका कांस्य कामगाराला एक आधुनिक कल्पना सुचली. गुन्हेगारांना शिक्षेसाठी एक भयानक गोष्ट बनवण्याची. आणि त्याने निर्माण केलं. ” ब्रोझेन बुल ” हा ब्रोझेन बुल म्हणजे काय तर एक कांस्यचा बैल तयार करण्यात आला जो आतून पोकळ होता.

या बैलाच्या पोटाला एक छोटासा दरवाजा देखील लावण्यात आला होता. या बैलाच्या पोटात एक माणूस झोपू शकेल अशा पध्दतीने जागा ठेवण्यात आली होती. क्रूर शिक्षेसाठी पात्र ठरलेल्या व्यक्तीला हात पाय बांधून या बैलांच्या पोटात टाकून वरून झाकण लावले जायचे. ज्याला बाहेरून टाळा लावला जायचा. आता यात त्या व्यक्तीला उपाशी कोंडून ठेवले जायचे. आता यात एवढे क्रूर काय असा प्रश्न तुम्हाला पडेल मात्र तसे नाही.यापुढेही अजून क्रूरता सुरू होते.

त्या कोंडून ठेवलेल्या व्यक्तिला आत उघडे करून नग्न अवस्थेत ठेवले जायचे. आणि हळूहळू त्या जागेच तापमान वाढवलं जायचं. हळूहळू भयंकर चटके बसायला लागत. आतली व्यक्ती जेव्हा भयंकर वेदनेने विव्हळत असे तेव्हा त्याची आर्त किंकाळी बाहेर पडायला केवळ एक मार्ग असे. त्या बैलाच्या मुखातून तो आवाज जेव्हा बाहेर पडायचा तेव्हा बैलाच्या हंबरण्याचा भास व्हायचा. वेदनेने तरफडूनच त्या व्यक्तीचा दुर्दैवी अंत होत असे.

जेव्हा त्या व्यक्तीला पूर्ण उघडं करून आत टाकून कुलूप लावलं जात असे, तेव्हा आतमध्ये अचानक वातावरण गरम होऊ लागत असे. सुरुवातीला चटके बसतात मग नंतर धातू अजून गरम होऊ लागतो आणि गरम धातूमूळे त्वचा जळू लागते आणि ती किंकाळी देखील बाहेर पडते मात्र लोकांना ऐकू जातं ते बैलांचं हंबरण.. हे ऐकूनच आपल्याला जर भीती वाटत असेल तर मग आत असलेल्या माणसाची काय हालत होत असेल? हे प्राचीन ग्रीसमध्ये शिक्षा देण्यासाठी तयार केलेले एक साधन होतं.

अक्रॅगस व सिसिलीचा जुलमी राजा फालारिस याच्या राज्यातील कांस्य कामगार पेरिलोस याने याचा शोध लावला. हा बैल संपूर्ण पितळातून/कांस्यातून बनवलेला आणि पूर्ण पोकळ असे. त्याच्या एका बाजूला एक दरवाजा बनविला जात असे. पौराणिक कथेनुसार, ब्रेझन बैल प्रत्यक्ष बैलाच्या आकारात बनविला गेला होता आणि त्यात ध्वनिक उपकरणे होती ज्यामुळे आतल्या किंचाळ्या बैलाच्या आवाजामध्ये रूपांतरित होत असत.

गुन्हेगारांना या यंत्राच्या आत कुलूपबंद करत आणि त्याखाली आग लावली जात असे. तापलेल्या धातूमूळे जेव्हा गुन्हेगार तडफडत ओरडू लागत तेव्हा त्याच्या किंकाळ्या बैलाच्या नाकात असलेल्या लहान पाइप मधून बाहेर येत आणि बाहेर ऐकणाऱ्याला त्या किंकाळ्या बैलाच्या ओरडण्यासारख्या वाटतं. असं म्हणतात की जेव्हा पेरिलोसने हा बैल बनवून आणला तेव्हा या बैलाची चाचणी करण्यासाठी राजा फालारिसने पेरिलोसलाच त्यात कोंडून मारले.

पण याविषयी देखील इतिहासाकरांमध्ये दुमत आहे. खरच असा कुठला बैल बनवला होता का यावर इतिहास संशोधकांमध्ये बराच वाद आहे. काहींच्या मते राजा फालारिस किती अत्याचारी होता हे दाखवण्यासाठी ही बैलाची आख्यायिका बनवली तर काहींच्या मते असा बैल अस्तित्वात होता आणि फालारिसने तो वापरला. पण जे काही असो, हि शिक्षा देण्याची पद्धत मात्र खूप क्रूर होती यात काही शंका नाही.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *