मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आपल्या नव्या बाळाच्या आगमाची बातमी चाहत्यांना दिली आहे. यातच आणखी एका मराठी अभिनेत्रीचे नाव समोर आलं आहे. मृणाल दुसानिस आणि तिचा पती नीरज मोरे यांचा विवाह २५ फेब्रुवारी २०१६ ला झाला होता. नीरज हा अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ते दोघे लवकरच एका बाळाचे आई वडील होणार आहेत साधी सरळ आणि सोज्वळ अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.
तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली. सोशल मीडियावर तिने आपल्या अकाऊंटवर लहान बाळाच्या वस्तूंचा म्हणजे कपडे आणि खेळणी अशा वस्तूंचा फोटो शेअर केला आहे आणि त्यासोबत लिहले आहे, आता आमच्या आयुष्यात येणाऱ्या पाहुण्यासाठी वेळ देणार आहोत. त्यामुळे आता आमची झोप कमी होणार, ही बातमी आमच्यासाठी खूप आनंदाची आहे असे तिने म्हटले आहे.
तिला यासाठी तिच्या चाहत्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक कलाकारांनी ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मृणाल हिने अनेक मालिकेत काम केले आहे. तू तिथे मी, अस्स सासर सुरेख बाई, सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच माझिया प्रियाला प्रीत कळेना ही तिची पहिली मालिका होय. तसेच नाटकांमध्ये ही काम केले आहे. तसेच ती उत्तम नर्तकी आहे तिने एका पेक्षा एक, अप्सरा आली या स्पर्धेत भाग घेतला होता.

तसेच तिचा पहिला चित्रपट ” श्रीमंत दामोदर पंत होय. मृणाल या गोड अभिनेत्रीला तिच्या या गोड बातमी साठी शुभेच्छा..