क्रीडा

महेंद्र सिंग धोनीला आजच्या सामन्यात हा मोठा विक्रम मोडण्याची संधी

Mahendra Singh Dhoni

आज आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएई मध्ये मोठ्या दिमाखात सुरुवात होणार आहे. लॉक डाऊन आणि महामारी मुळे २०२० ची आयपीएल होते का नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला होता. अखेर अनेक संकटावर मात करत काही तासातच ही स्पर्धा मोठ्या दिमाखात सुरू होणार आहे.

पहिलाच सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग (Chennai Super Kings) संघात खेळला जाणार आहे. मागच्या वर्षी म्हणजेच २०१९ च्या आयपीएल स्पर्धेत हे दोन बलाढ्य संघ अंतिम सामन्यात भिडले होते. चुरशीच्या झालेल्या सामन्यात अवघ्या एका धावेने मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग संघाचा पराभव करून विजय श्री खेचून आणला होता.

ह्याच पराभवाचा बदला घेण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरेल ह्यात काही शंका नाही. खूप दिवसांनी क्रिकेट पाहायला मिळेल ही उत्सुकता तर आहेच पण सर्वात जास्त उत्सुकता महेंद्र सिंग धोनीला पुन्हा एकदा खेळताना पहायची असेल. १४ महिन्यानंतर तो पुन्हा एकदा क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळेल.

त्याने आपला शेवटचा सामना २०१९ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो क्रिकेट पासून लांबच राहिला. पण मागच्याच महिन्यात त्याने निवृत्ती जाहीर केली आणि सर्वांना धक्का दिला. आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये जरी आपण त्याला खेळताना पाहू शकलो नाही तरी आयपीएल मध्ये आपण नक्कीच धोनीला खेळताना पाहणार आहोत.

आयपीएल इतिहासात सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे. १७४ सामने त्याने कर्णधार म्हणून खेळले असून १०४ सामन्यात विजय मिळवला आहे. आयपीएल मधील सर्वाधिक अंतिम सामने खेळणार कर्णधार म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे.

आजच्या सामन्यात महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. असे त्याने केले तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा धाकड फलंदाज AB de Villiers चा विक्रम तो मोडीत काढेल. आयपीएलच्या मौसमात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या पंक्तीत धोनी तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. त्याने आतापर्यंत २०९ षटकार मारले आहेत.

AB de Villiers ने २१२ षटकार मारले आहेत. जर आजच्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात चार षटकारांची आतषबाजी केली तर AB ला मागे टाकून धोनी दुसऱ्या स्थानी येऊ शकतो. त्यामुळे धोनी कडे सर्वांचे लक्ष लागून असणार ह्यात काही शंका नाही.

आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या यादीत क्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. त्याने आजवर ३२६ षटकार मारले आहेत. आणि त्याच्या ह्या विक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न तर सर्वांचा असेल पण ते खूप कठीण काम आहे.

मुंबई इंडियन्स संभावित संघ

रोहित शर्मा (कर्णधार), डीकॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, नॅथन कुल्टर नाईल, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमरहा.

चेन्नई सुपर किंग संभावित संघ

महेंद्र सिंग धोनी (कर्णधार), शेन वॉटसन, डू प्लेसिस, अंबाती रायडू, केदार जाधव, ब्रावो, रवींद्र जडेजा, पियूष चावला, इमरान ताहीर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर.

तुम्हाला काय वाटतं मित्रानो आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? तुम्ही कोणत्या संघाला समर्थन करत आहात? आम्हाला नक्की कळवा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *