मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल विरूद्ध झालेल्या फायनल सामन्यात पलटण ने दिल्ली चे तख्त राखिले आहे. २०२० च्या आयपीएल मध्ये सुद्धा आपला दबदबा कायम ठेवत मुंबई ने विजय श्री पुन्हा एकदा आपल्या खेचून आणला. टॉस जिंकून दिल्ली ने फलंदाजी स्वीकारली.
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने १५६ धावांच मापक आव्हान मुंबई समोर ठेवलं. ह्यात श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत ह्यांनी अर्धशतकी खेळी करून संघाचा डाव सावरला. श्रेयस ने ५० चेंडूत ६५ तर पंत ने ३८ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. स्टोयनिस, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, हेटमायर, अक्षर पटेल ह्यांनी हवी तशी फलंदाजी न केल्याने धावसंख्येचा डोंगर दिल्ली संघाला रचता आले नाही.
मुंबई कडून बोल्ट ने ३, कूल्टर नायर ने २, जयंत यादवने ने १ एक गडी बाद करून उस्कृष्ट गोलंदाजी केली. मुंबई ने फलंदाजी करताना चांगली सुरुवात करत धावसंख्या पुढे सरकावली. पण डिकोक चांगल्या फॉर्म मध्ये दिसत असताना स्टोयनिसने त्याला बाद केले. आणि इन फॉर्म फलंदाज सूर्यकुमार यादव चांगली खेळी करत असताना रोहित शर्माच्या चुकीने त्याला रण आऊट होण्यास भाग पाडले. त्यांनतर मुंबईचा डाव रोहित आणि ईशान किशन ने सावरला आणि मुंबई इंडियन्स संघाला पाचव्यांदा आयपीएल किताब जिंकवण्याचा मान मिळवला.