मनोरंजन

इवल्याश्या परीला अशी मिळाली झी मराठी वाहिनीवरील तुझी माझी रेशीमगाठ मालिका

या बाळ कलाकाराचे नाव आहे मायरा वैकुल ती सध्या फक्त पाच वर्षाची आहे आणि इतक्या लहान वयात खरोखर उत्तम अभिनय करणारी ही मायरा सर्वांच्या मनाला भावली आहे. मायरा म्हणजेच तुमची आमची सर्वांची लाडकी परी. ती सध्या मुंबई मध्येच राहते. मायरा हीचे वडील गौरव वैकुळ हे आर्थिक सल्लागार तर आई श्वेता वैकुळ गृहिणी आहे.

२०२० मध्ये जेव्हा लॉक डाऊन पडले होते तेव्हा तिच्या आईच्या डोक्यात आले की, आपण ही इतरांप्रमाणे आपल्या मायराचे एक यूटुब चॅनल ओपन करावे म्हणून तिने मायरा कॉर्नर हे युटुब चॅनल काढले. मायराचे व्हिडिओ लोकांना खूप आवडले त्यांनी तिच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद मिळाला.

Source Myra vaikul social handle

पुढे जाऊन तिने टिकटॉक वर व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली. अत्यंत कमी वेळात लोकांनी तिच्या व्हिडिओ ना भरभरून प्रतिसाद दिला. तिच्या सुंदर दिसण्यामागे सुद्धा एक गुणी कलाकार लपलेला आहे हे प्रकर्षाने जाणवते. तिच्या याच कलागुणांमुळे झी मराठी ने आपल्या एका सिरीयल साठी तिची निवड केली.

त्यातूनच तिला “जुळून येती रेशीमगाठी” या मालिकेत जाण्याची संधी मिळाली. या मालिकेत मायरा परी हे पात्र साकार करताना दिसत आहे याशिवाय ती एका सिंगल आईची मुलगी दाखवली आहे. तिची आई म्हणजे प्रार्थना बहिरे पण तरीही समजूतदार अशी परी तिला लहानपणा पासूनच मधुमेह असल्यामुळे आई आणि मुली मधील अशा घटना दाखवल्या आहेत ते बघून प्रेक्षक हळवे झाले.

अनेक मराठी सिनेमाचा निर्माता आहे प्रार्थना बहिरे हिचा नवरा. खूप कमी लोकांना हे माहीत आहे

मायरा हीची आवड म्हणजे चित्रकला याशिवाय डान्स करणे आहे. तिचा डांस आणि तिचे डायलॉग सोशल मीडियावर लोकांना खूप आवडले आहेत. शिवाय मालिकेतील इतर कलाकार यांच्यासोबत ही मायरा मजा मस्ती करताना सोशल मीडियावर दिसते. तिने लहान असल्यापासून फोटोशूट केले आहे.

इतक्या लहान पणी ही छोटीशी परी इतकी उत्तम भूमिका करून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे तर मोठेपणी ही नक्कीच अभिनेत्री होणार. तर तुम्हाला आवडते का या परीची भूमिका कॉमेंट करून नक्की सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *