मनोरंजन

खलनायक नागेश भोसले यांची मुलगी आहे प्रसिद्ध बॉडी बिल्डर

Kuhu bhosle

मराठी मोठ्या आणि छोट्या पडद्यावरील कलाकारांची मुले ही सुध्दा आपल्या आई वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन याच इंडस्ट्रीमध्ये आलेली आपण नेहमी पहिली आहेत. पण अशी ही काही कलाकारांची मुले आहेत ज्यांना इथे येण्यात काडी मात्र आवड नसते त्यांच्या आवडी निवडी वेगळ्या असतात.

आपले वडील किंवा आई ज्या फिल्डमध्ये आहेत तेच आपल्याला करायची गरज नाही. आपली आवड वेगळी असू शकते. हेच दाखवून दिले आहे मराठी अभिनेता नागेश भोसले यांच्या मुलीने. नागेश भोसले ह्यांना तुम्ही आम्ही सर्वच ओळखून आहोत. एक दमदार खलनायक कसा असतो हे त्यांनी नेहमीच दाखवून दिलं.

नागेश भोसले एक उत्तम अभिनेता खलनायक असे आहे पण त्यांची मुलगी कुहूने अभिनेत्री न होता बॉडी बिल्डर होण्याचा छंद जोपासला आहे. सध्या या फिल्डमध्ये अनेक तरुणी येत आहेत. तिने यापुढे जाऊन याच फिल्ड मध्ये करियर करायचे ठरवले आहे. शिवाय ती प्रसिद्ध बॉडी बिल्डर आहे. त्यांना एक मुलगी कुहू भोसले आणि एक मुलगा आहे.

Source Kuhu Bhosle Social Media

तिने जवळ जवळ वयाच्या सतराव्या वर्षापासून या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ती इंटरनॅशल बिकिनी अँथलेट असून ती फिटनेस ट्रेनर ही आहे. ती तिचे फिटनेसचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नागेश भोसले यांनी देवयानी, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, पन्हाळा यांसारखे अनेक चित्रपट तसेच मालिका केल्या आहेत. तसेच ते प्रसिद्ध दिग्दर्शक ही आहेत.

करियर करत असताना तिचे बाबा नागेश भोसले यांनी तिला साथ दिली आहे. एक संस्थेमध्ये भारतीय महिलांना यात प्रोत्साहन देण्याचे ती काम करते. सोशल मीडियावर कुहू भोसले असे सर्च केलेत तर तिचे सोशल अकाउंट तुम्हाला पाहायला मिळतील.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *