मनोरंजन

नम्रता आवटे संभेराव हिच्या बद्दल माहीत नसलेल्या गोष्टी

नम्रता संभेराव

नम्रता संभेराव हिने जरी अनेक चित्रपट आणि नाटक मध्ये काम केले आहे पण तरीही ते खरी ओळख ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या सोनी मराठी वर प्रदर्शित होणाऱ्या शो ने झाली. तिची बिनधास्त कॉमेडी आणि त्याच्यात ही वेगवेगळे प्रकार ही तिची शैली होय. हिचा जन्म मुंबईत झाला.

शिवाय शिक्षण ही मुंबईत झाले पण तिचे तिचे मूळ गाभा राजोरी हे आहे. तिने योगेश संभेराव याच्यासोबत लग्न केलं आहे. तिला एक मुलगा ही झाला आहे त्याचे नाव तिने रुद्राक्ष ठेवले आहे. पुढे ती एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेत आहे सुरुवातीला तिने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून ही काम केले आहे. एखाद्या मालिकेमध्ये किंवा सिनेमात तिचा छोटासा सिन असला तरीही ती खूप खुश व्हायची.

तिच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती म्हणजे महाराष्ट्राचा सुपर स्टार या रिऍलिटी कॉमेडी शो ने. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ग साजणी, कॉमेडीची बुलेट ट्रेन, बाप माणूस या सारख्या मालिकांमध्ये नम्रता हिने आपला ठसा उमटवला. प्लॅन चेट, गिरगाव वाया दादर, आबालाल अड कित्ते, मुमताज महल, पाहिलं पाहिलं इत्यादी नाटकांमध्ये तिने काम केले आहे.

तसेच महत्वाची गोष्ट म्हणजे यानंतर तिला आपण मुवी मध्ये पहिली ती म्हणजे बाबू बँड बाजा, व्हेंटिलेटर या अशितोष गोवारीकर यांच्या सिनेमात ती आपल्याला दिसली. याचसोबत तिने हिंदी मालिकेत ही काम केले आहे ते म्हणजे आदत से मजबूर.

महाराष्ट्राची हास्य जत्रा यामधील प्रत्येक रोल साकारताना तिच्यातील उत्तम अभिनेत्री आपल्याला जवळून दिसत असली तरी लॉल्ली या कॅरेक्टर ने तिने खूप हसवले आहे. कॅरेक्टर मध्ये असताना तिची भाषा, केसांची बनावट, पेहराव तिची अॅक्टींग हे सगळं काही हसण्यासारख असतं आणि हेच रसिकांना जास्त आवडते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *