विचारधारा

महाराष्ट्रीयन नथ बद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत नसतील

प्राचीन काळापासून ते आजपर्यंत स्त्रियांमधील दागिना घालायचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. लग्नात महाराष्ट्रीयन नथ घातल्याशिवाय नवरीचा साजशृंगार पूर्ण होत नाही. पण सध्याच्या जो काळ चालू आहे त्यात सर्वच स्त्रिया नथ घालतात अगदी कोणतही सण असो नथ घातली जाते. त्यामुळे चेहऱ्यावरील सौंदर्य अधिक वाढते. बघायला गेलात तर नथ हा पेशवाई दागिना आहे.

या नथमध्ये अनेक प्रकार आहेत पेशवेकालीन नथ, मराठा नथ, ब्राम्हणी नथ, कारवारी नथ, बानू नथ. मध्यंतरी नथीचा नखरा म्हणून खूप स्त्रियांनी सोशल मीडियावर आपले नथ घातलेले फोटो टाकले होते. पिवळे मोती आणि त्यात हिरवे, लाल आणि पांढरे हिर्यांची गुंफलेला रेखीव दागिना म्हणजे नथ होय.

Source Social Media

पहिले अशाच प्रकारच्या नथ असायच्या पण आता काळानुसार या नथी मध्ये वेगवेगळे प्रकार आपल्या पाहायला मिळतात. कोणी एकदम नाजूक घाळणे पसंत करतात तर कोणाला मोठी नथ आवडते. आजकाल तर मोत्याच्या नथी ऐवजी सोन्याची चांदीची तसेच ऑक्साइडची नथ वापरण्याची फॅशन आली आहे.

आताच्या काळात नाक टोचले नसले तरीही नथ घालू शकतो. त्यासाठी बाजारात प्रेस नथ मिळते ती फक्त टाकत दाबून बसवायची. बॉलिवूडमध्ये ही नथीच फॅड आहे. बाजीराव मस्तानी मध्ये प्रियांका चोप्राने जी नथ घातली होती ती सुद्धा नंतर लोकप्रिय झाली होती. मनिकर्निका मध्ये ही कंगना ने नथ घातली होती.

आता तर नथ घालण्यासाठी पारंपरिक नऊवारी साडी नेसण्याची ही गरज नाही वेस्टर्न ड्रेस वर ही नथ घातली जाते. हल्ली तर खण साडीवर ही नथीची डिझाईन काढून ती साडी अधिक आकर्षित केली आहे शिवाय साडी पिन म्हणून नथ वापरली जाते.

Source Social Media

याशिवाय सध्या वापरला जाणारा दागिना म्हणजे ठुशी मंगळसूत्र हा सुध्दा नथ वापरून बनवला जातो. पारंपरिक असलेली नथ कुठेतरी पुन्हा नव्याने स्त्रियांच्या वापरात येत आहे आणि त्यांच्या संदर्यात अधिक भर टाकत आहे. त्यामुळे आपल्या पारंपरिक अशा भरपूर गोष्टी आहेत त्या अशाच नव्या रूपाने लोकांच्या नजरेत याव्या.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *