मनोरंजन

माझा होशील ना या मालिकेतील पिंट्या मामा बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का

सध्या लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे माझा होशील ना सध्याचं या मालिकेतील नायक आणि नायिका या दोघांनाही अवॉर्ड मिळाला आहे. यांच्याशिवाय या मालिकेत अत्यंत मोलाचे काम केले आहे ते चार मामांनी यातील एक छोटा मामा म्हणजे पिंट्या मामा. याचा या मालिकेत गाड्यांचा गॅरेज आहे शिवाय थोडी फार कॉमेडी ही हा मामा करतो. त्याच्या साइज प्रमाणे त्याला खायला लागते असे यात दाखवले आहे.

तर चला बघुया या पिंट्या मामाच्या खाजगी आयुष्याबद्दल याचे खरे नाव निखिल रत्नपारखी आहे. या पिंट्या मामाने मराठीतच नाही तर हिंदी, इंग्लिश आणि तमिळ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. निखिल रत्नपारखी यांच्या जन्म पुण्यात झाला. त्याची बायको ही सुध्धा एक उत्तम अभिनेत्री आहे. तीच नाव भक्ती रक्तपारखी आहे सध्या झी मराठीवर चालू असलेली मालिका अग बई सासू बाई या मालिकेत भक्ती काम करत आहे.

निखिल ह्यांनी ओ माय गॉड या हिंदी सिनेमात काम केले आहे. ह्याच सिनेमात अक्षय कुमार आणि परेश रावल ह्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. शिवाय अनेक हिंदी जाहिराती सुद्धा त्यांनी केल्या आहेत. ह्याशिवाय मागच्या वर्षी मराठी मधील गाजलेली वेब सिरीज काळे धंदे मध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका केली होती.

पिंपळपान या अत्यंत लोकप्रिय मालिकेतून निखिल यांचे कला क्षेत्रात आगमन झाले. बॉलिवूड मध्ये हवा आने दे, फुचर तो ब्राईट है जी, पहेली, तेरे बिन लादेन, जयंती भाई की लव्ह स्टोरी, तसेच भाकरवडी ही हिंदी सीरियल ही केली आहे. निखिल याला पुस्तक वाचायला खूप आवडते.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *