बातमी

का कमी होत नाहीत पेट्रोल, डिझेलच्या किमती यावर वित्तमंत्री निर्मला सीतारमन काय म्हणाल्या

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दिवसेंदिवस कमी न होता वाढत चालल्या आहेत. आणि ह्या किमती इतक्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत की याचा जास्त भार हा सामान्य जनतेवर पडत आहे. गडगंज श्रीमंत लोकांना काहीच फरक पडत नाही पण जो माणूस दिवसभर आपल्या घरातील लोकांसाठी मेहनत करत असतो. एक एक पैसा खर्च करताना विचार करतो त्याला या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने हैराण केले आहे.

सध्या मुंबई मध्ये पेट्रोल १०७.८३ तर डिझेल 97.45 चालू आहे. ह्या किमती पाहून जनता रोष व्यक्त करत आहे पण केंद्र सरकार कडून हवं तसे उत्तर मिळत नाहीये. विरोधी पक्ष आणि जनता सतत या इंधनात घट करण्याची मागणी करत आहे पण तरीही यावर वित्त मंत्री सीतारमन म्हणतात की, इंधनाच्या वाढत्या किमतीवर कोणत्याही प्रकारची घट करण्यात येणार नाही.

वित्त मंत्री सीतारमन यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ऑईल बाँड मुळे आपल्या सरकार वर बोझा आला आहे. म्हणून आम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती करू शकत नाही. जनतेचा आक्रोश ठीक आहे पण तरीही जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार काहीही पर्याय काढत नाहीत तोपर्यंत हे चालूच राहील.

सरकार कडून अशी उत्तरे मिळाल्याने नागरिक संतप्त होत आहेत. कारण सध्या ट्रेन बंद आहेत आणि सर्वांना आपल्या वयक्तिक वाहनावर प्रवास करावा लागतोय. आणि वाढलेल्या किमती नागरिकांच्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *