बातमी

तब्बल दहा वर्षांनी मोठ्या दिमाखात निशिगंधा वाढ ह्या मालिकेतून करत आहेत पदार्पण

नवीन मालिका चालू होणे आणि जुन्या मालिका निरोप घेणे हे काही नवीन नाही. म्हणून आता आपल्या भेटीला स्टार प्रवाह वाहिनीवर येत आहे जय भवानी जय शिवाजी ही नवीन मालिका. आता तुम्ही म्हणाल अशा भरपूर मालिका आल्यात पण तरीही या मालिकेतील कलाकारांचा प्रोमो मधील अभिनय बघता ही मालिका तग धरून राहील असे वाटते. प्रोमो मध्ये दाखवल्याप्रमाणे निशिगंधा वाढ ह्या प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ यांची भूमिका त्यांनी केली आहे. शिवाय प्रोमो मध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांची भूमिका माणसाला जागेवर खिळवून ठेवणारी आहे. तसे पाहायला गेलात तर निशिगंधा वाढ या इतिहासाच्या अभ्यासक आहेत. त्या आपल्या भावना थांबऊ शकल्या नाहीत.

त्या बोलल्या ताठ कण्याची, कर्तृत्ववान माऊली अशी ही भूमिका करणे म्हणजे माझे भाग्य आहे. शिवाय इतकी कणखर भूमिका करायला मिळणे हा दैवी योग आहे. ही दमदार भूमिका लोकांसमोर आणण्यासाठी त्या खूप उस्तुक आहेत. या भूमिकेत कुठेही कमी पडू नये यासाठी त्या प्रयत्नशील असेन.

छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांनी दिलेल्या समर्पणाची यात आपल्याला माहिती मिळणार आहे. यात अनेक कलाकारांचा समावेश आहेत. छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत भूषण प्रधान तर बाजीप्रभूची भूमिका ही अजिंक्य देव यांनी केली आहे. तर नेतोजी पालकर यांच्या भूमिकेत कश्यप परुळेकर हे दिसणार आहेत. आणि शिवा काशिद यांची भूमिका विशाल निकम यांनी केली आहे.

याअगोदर तुम्ही निशिगंधा वाड यांना वेगवेगळ्या भूमिकेत पाहिले असेलच त्यांनी अनेक चित्रपट मध्ये काम केले आहे त्यामुळे त्यांची ही माता जिजाऊची भूमिका बघायला तुम्ही उस्तुक असलाच. 26 जुलै पासून ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर रात्री दहा वाजता सुरू होणार आहे. कोणकोण उस्तुक आहेत बघण्यासाठी कमेंट करून सांगा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *