मनोरंजन

फीलहाल गाण्यातील ही अभिनेत्री आहे ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण

मागच्याच महिन्यात फीलहाल २ हे अक्षय कुमार आणि बी प्राक ह्यांचं गाणं प्रदर्शित झाले. सर्वांना हे गाणं इतकं आवडले की अजूनही हे गाणं ट्रेडींगमध्ये आहे. ह्या गाण्यात मुख्य लीडमध्ये असणारी अभिनेत्रीने सर्वांची मने जिंकली. तिचा लूक, गाण्यातील तिचा वावर, अभिनय अगदी सर्वच लोकांना आवडू लागला. ह्या अभिनेत्रीचे नाव नुपूर सेणन आहे.

ती एक उत्तम गायिका सुद्धा आहे आणि अभिनय सुद्धा करते. मागच्या वर्षी फीलहाल ह्या गाण्यामुळे ती प्रकाशझोतात आली होती. ह्याचे कारणही अगदी तसेच होत कारण ह्या गाण्यामार्फत अक्षय कुमार पहिल्यांदा अल्बम साँग करत होता. हे गाणं एवढे लोकांना आवडले की लगेचच गाण्याच्या सिक्वल ची घोषणा केली होती. मागच्याच महिन्यात फीलहाल २ हे साँग सुद्धा प्रदर्शित झालं.

ह्या गाण्यामुळे सुद्धा तिचा चाहतावर्ग वाढत गेला. लोकं ऑनलाईन तिच्याबद्दल सर्च करू लागले. ऑनलाईन सर्च केल्यानंतर लोकांना कळले की तिचे बॉलीवूड कनेक्शन सुद्धा आहेत. सध्याची चर्चित अभिनेत्री क्रिती सेणन हीची ती बहीण आहे. क्रितीला तर तुम्ही सर्वच ओळखत असणार. टायगर श्रॉफ सोबत तिने हिरोपंती सिनेमातून आपला बॉलिवूड डेब्यू केला होता.

त्यानंतर तिने अनेक बॉलीवूड सिनेमात कामे केली आहेत. भव्यदिव्य रामायाणावर आधारित आदिपुरुष सिनेमात ती माता सीतेची भूमिका करत आहे. ह्याच सिनेमात राम म्हणून बाहुबली म्हणजेच प्रभास दिसणार आहे. नुपूर ही क्रितीची बहिण आहे हे खूप कमी लोकांना माहीत आहे. ह्या दोघीही कोणत्याच बॉलिवूड फॅमिली कडून येत नाहीत. त्यांनी आपली ओळख स्वतःच निर्माण केली आहे. आधी क्रिती मग आता नुपूर सुद्धा नावारूपास येत आहे.

सध्या मिमी सिनेमाची जोरदार चर्चा आहे. बऱ्याच दिवसांनी चांगली कथा आणि उत्तम अभिनय ह्याचा मेळ पाहायला मिळाला. मिमी सिनेमात मुख्य भूमिका करणाऱ्या क्रिती सेणनचे सध्या खूप कौतुक होत आहे. कारणही अगदी तसेच आहे. कारण ह्या सिनेमात तिने जीव ओतून काम केलं आहे. सिनेमातील अनेक वेळी काही गोष्टी मनाला स्पर्श करतात.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *