मनोरंजन

ओंकार भोजने नव्याने नावारूपाला आलेला चेहरा

महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हटली की तुमच्या समोर पहिली नावे येतात समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव. पण ह्या सर्वात अजून असे काही कलाकार आहेत ज्यांनी आपली एक नवीन ओळख निर्माण केली आहेत. ह्यात गौरव मोरे, ओंकार भोजने, वनिता खरात, दत्तू मोरे, प्रिथविक जगताप, चेतना भट, ह्यांचा देखील आवर्जून उल्लेख केला जातो.

कारण त्यांनी आपल्या अभिनयाने अक्षरशः चार चांद लावले आहेत. आज आपण ओंकार भोजने बद्दल सविस्तर जाणून घेऊया. ओंकार भोजने हास्य जत्रेमधे समोर दिसल्यावर अपोहिन हसू येते असा कलाकार आहे. त्याची एन्ट्री झाली म्हणजे स्टेजवर एनर्जी निर्माण झाली. त्याचा जन्म चिपळूण मधे 16 मार्चला झाला आहे. तो लहानाचा मोठा इथेच झाला.

चिपळूण येथे शिक्षण घेत असताना त्याने एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली त्यानंतर अनेक एकांकिकाही केल्या. त्यानंतर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉईज 2 या सिनेमात नरू बोंडवे ही नकारात्मक भूमिका त्याच्या वाट्याला आली. ही भूमिका प्रेक्षकांना खूप जास्त आवडली. तसेच त्याने व्हिडिओ साँग ही केले आहेत.

युट्यूबवर त्याचा मी कोळी नंबर 1 हा व्हिडिओ साँग ही आहे. तसेच नवोदित मराठीतील कलाकारापेकी ह्याचेची नाव अग्रेसर आहे. कॉमेडीची एक्स्प्रेस आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा करता या दोन शो मधून ओंकार ने लोकांना हसवले आहे. आपण नेहमीच त्याला वेगवेगळे स्कीट करताना पाहिले आहे पण नक्कीच त्याच्या अजून जास्त अभिनयाची क्षमता आहे.

त्याच्या वाट्याला सिनेमे यावेत. महाराष्ट्राची हास्य जत्रा यामधील तुम्हाला त्याचे स्कीट सर्वात जास्त आवडते आणि हसवते ते ही सांगा. ओंकारचे बहुतेक स्कीट हे वनिता आणि गौरव मोरे सोबत आहेत. तसेच या हास्यजत्रेमध्ये त्याने अवतरलेली विविध भूमिका म्हणजे अफलातूनच.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *