विचारधारा

शिक्षणाची वारी इंटरनेटच्या दारी

online study

जिकडे तिकडे शिक्षण पद्धतीवर ताशेरे उडताना दिसतात. हल्लीची परिस्थिती पाहता त्यानुसार बदल ही तिकडेच महत्त्वाचे आहेत, बदलत्या परिस्थितीबरोबर जुळवून घेताना अनेकदा पालकांची आणि पाल्यांची ओढाताण होताना दिसते. हल्लीच्या गोष्टी पाहता योग्य गोष्टींची निवड तितकीशी होत नाही. सध्याचा विषय अंतिम वर्गाच्या परीक्षा आणि ऑनलाईन शिक्षण पद्धती.  अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होताना दिसत आहेत. आपापल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद देत विद्यार्थी परीक्षा देताना दिसतात. अंतिम वर्षांच्या मध्यात कोरोनाचे आगमन झाले. शेवटच्या काही विषयाच्या शिकवण्या, revisions, submission, assignments, सगळे कॉम्प्लिशन्स पुढे ढकलले गेले. शक्य तसे ऑनलाईन सर्व कामं करून घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र या सर्वांत विद्यार्थ्यांची होणारी ओढाताण मात्र दुर्लक्षितच.

शाळेसह खासगी शिकवण्या घेणे हे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे.  बाहेर पडण्यावर निर्बंध आल्यामुळे खासगी शिकवण्याही व्हिडिओ आणि ऑडिओ व्याख्यानांच्या माध्यमातून ऑनलाइन घेतल्या जात आहेत. आता तुम्ही म्हणाल की विद्यार्थ्यांना कसला त्रास ?? घरी बसून मस्त मजेत चालले आहे सर्व, हा झाला म्हणण्याचा विषय पण हेच विद्यार्थी या वर्षीचे नवीन फ्रेश जॉब सीकर्स असणार आहेत. परीक्षा पास तर सगळेच होणार मात्र याचे होणारे दुरगामी परिणाम हे उघड्या डोळ्यांनी ही सहज लक्षात न येण्यासारखे आहेत. या साठी थोडासा वैचारिक पातळीवर विचार करणे आवश्यक नक्कीच आहे.

त्याच सोबत ऑनलाइन शिक्षणाच्या दिशेने घाईत उचलल्या गेलेल्या या अनियोजित पावलामुळे ‘डिजिटल उपलब्धता’ नसलेला एक मोठा वर्ग या आभासी वर्गांबाहेर फेकला गेला आहे. हा ही मुद्दा तेवढाच महत्वाचा.

अंतिम वर्षात असलेली अनु आता परीक्षेच्या तयारीला लागणार तोच लॉकडाऊनची घोषणा झाली. मुळात आपल्या करिअर बाबत काहीशी गंभीर असलेली अनु शेवटच्या वर्षात उत्तम गुण मिळवून जॉब साठी रुजू होण्याचे स्वप्न बाळगून होती. लॉकडाऊन मूळे सर्वच जग जागेवर थांबले होते अपरिहार्य परिस्थिती होती. पर्याय नसल्याने सगळ्यांनीच ती स्थती मान्य केली.मुलं काहीशी रिलॅक्स झाली.  करमणुकीच्या साधनांनी संपूर्ण वेळ बळकावला.

परिणाम शाळेत कॉलेजात जाणे बंद , पूर्णवेळ tv, mobile, internet , full night chat, आणि social media ची सवय यामुळे अभ्यास करिअर या गोष्टी नकळत मागे पडल्या आहेत. उत्तम मार्क्स मीळवून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन जायचे विचार काहीसे रेंगाळले. ऑनलाईन submission आले, pdf एकमेकांना सेंड करत copy pest ही झाले , परिणामी त्या विषयांचा अभ्यास तर दूर आपण नक्की कोणत्या विषयाबद्दल लिहितोय सबमिशन देतोय हे ही लक्षात येईना, त्यांनंतर आले ऑनलाईन ओरल आणि MCQ ओरिअनटेड प्रश्न. सर्व विषयांची आशा प्रकारे आधी कधीही परीक्षा घेण्यात आली नव्हती. मूलं दुसऱ्या फोन वरून मित्रांशी कनेक्ट होत सल्ला मसलत घेऊ लागले, उत्तरांची देवाणघेवाण चालू झाली. आम्ही कसे सर्वांना मामा बनवतो याची मजा मुलं घेऊ लागली. ऑनलाइन लेक्चरला हजेरी लावूनही त्यातले 0 टक्के ज्ञान डोक्यात घेणारी ऑनलाईन विश्वात जगणारी मूलं.

हे सर्व करून मुलं पास झाली खरी पण आता त्यांच्या भविष्याचा खरा कस लागणार तो जॉब साठी भटकताना.. कंपनी प्रोफाईल मधे ही काही प्रमाणात अंतिम वर्षाची गुणपत्रिका पहिली जाते. अभ्यासक्रम आणि पदविका यांविषयी प्रश्न केले जातात.नियमित अभ्यासक्रम शिकलेले मुलं ही आशा वेळी इंटरव्ह्यू देऊन थकतात, कारण उत्तमोत्तम परिस्थिती हाताळून इंटरव्ह्यूवर आलेल्या उमेदवाराला प्रश्नांच्या जाळ्यात ओढून असे काही गुरफटून टाकतात की शेवटी प्रश्न पडतो आपण पदवीसाठी  नेमका हाच अभ्यासक्रम का निवडला असेल. प्रश्न बहुतेकदा प्रोफाइल वरून विचारले जातात, श्रीकांत ने अंतिम वर्षाची परीक्षा जेमतेम पास केली.

त्याने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ची ऑनलाईन पदवी मिळवून मोठी कामगिरी केली आहेच आता वेळ आहे नोकरीची, इंटरव्ह्यू मधे विचारलेले प्रश्न साहजिकच progamming, language आशा प्रकारचे असणार मात्र पदवीचे अनेक महिने vartualy घालवल्यावर याची उत्तर आठवणे काहीसे अवघडच होऊन बसले , आणि काय अभ्यास केला याचा विसर पडणे साहजिकच.. या सर्वात तोटा तो कोणाचा..? सततच्या नाकारणे  मात्र मनात एक न्यूनगंड निर्माण होतो. थोडक्यात एखाद्या हुशार विद्यार्थीही आपली कुवत विसरून जगतो असेच काहीसे समीकरण बनले आहे..  दिवसे दिवस महाविद्द्यालयातुन बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या वाढत आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा दर्जा वेगाने घसरत आहे. त्यामुळे देशाचे फार मोठे नुकसान होत आहे.

राष्ट्रीय विकास करायचा असेल तर भौतिक साधनसंपत्तीपेक्षा सर्वात महत्त्वाची साधनसंपत्ती म्हणजे मानव! ज्याप्रमाणे कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असल्याशिवाय ती इमारत मजबूत असू शकत नाही, त्याचप्रमाणे माणूस व शिक्षण या दोन्ही बाजू विकसित झाल्याशिवाय राष्ट्रविकास होऊ शकत नाही. मानव संसाधन विकासासाठी विविध कार्यक्षेत्रं पाहावयास मिळतात. उदा. शैक्षणिक, वैज्ञानिक, आíथक, धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक, सांस्कृतिक इ. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे एक हत्यार आहे. उत्कृष्ट नागरिक हा शिक्षणाच्या माध्यमातून घडवता येतो.

आज वाढत्या औद्योगिकिकरणाच्या परिस्थितीत व्यवसायाभिमुख आणि प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षणाची निकडीची गरज आहे.परंतु ती  गरज आज पूर्ण होत नाही. मुळात यात दोष कोणाचा हे उगाळत बसण्यात तितकासा अर्थ नाही.  गोष्टी एवढ्यावरच थांबत नाही, अंतिम वर्षच नाही तर ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या सगळ्याच वयोगटातील मुलांचे हेच हाल आहेत. पहिलीतून दुसरीत जाणार विद्यार्थी ही तितकाच गोंधलेल्या स्थितीत असणार आहे. सर्वांना शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेल्या या योजना आणि कायदे परिपूर्ण आहेत, असे म्हणता येणार नाही. किंबहुना, त्यांमधील त्रुटींकडे शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते सातत्याने लक्ष वेधत आहेत.तुम्हाला काय वाटतं? आजची शिक्षणपद्धती कशी आहे? यातून विद्यार्थी तर जन्माला येतायत पण ती माणूस कधी बनणार? व्यवहारज्ञान म्हणून जे प्रचलित आहे ते खरंच पुस्तकी ज्ञानातून मिळतं का?

पहिल्या वर्गातील शिक्षा गोंधळल्या स्थितीत ऐकून अर्ध कच्च ज्ञान घेऊन पालकांच्या मदतीने पुढे सरकलेला पाल्य कितीसा ज्ञान घेऊन शिकणार आहे. पालकांनी या कडे विशेष लक्ष देण्याची गरज तर आहेच, तरी याव्यतिरिक्त आपण काय करू शकतो हे ही मुद्दा महत्वाचाच.

शिक्षकांची भूमिका –

शिक्षक हा केवळ शिकवत नसतो, तर विद्यार्थ्यांत स्वतंत्रपणे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता निर्माण करत असतो. मुळात सध्याच्या काळात शिक्षकही  तितकेसे जवळचे नाहीत.  पालकांशी विदयार्थ्यांच्या प्रगतीबाबत चर्चा करणे ही तितकेसे शिक्षक मनावर घेत नाहीत. विदयार्थ्‍यांवर आपले विचार न लादता शिक्षकाने विदयार्थ्‍यांच्‍या मताचा आदर करावा. त्‍याला प्रकटीकरणाची संधी दिली तरी उत्तमोत्तम विद्यार्थी घडायला मदतच होईल.त्याच बरोबर  शिक्षकाने जिज्ञासू वृत्ती धारण करून नित्य नव्या गोष्टी जाणून घ्याव्यात. शिक्षक व्यासंगी सखोल अभ्यास करणारा असावा.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *