हेल्थ

पत्रावळीत जेवल्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

गेली अनेक शतके आपल्या समाजात पत्रावळी वर जेवण जेवतात म्हणजे कोणाकडे लग्न असो किंवा पूजा, मुंज, हळद, घरभरणी इत्यादी कार्यात तुम्हाला जेवण असतेच पण त्या जेवणासाठी पत्रावळीचा उपयोग होतो. पत्रावळी पळसाच्या पानांच्या बनवल्या जातात. सर्व गरीब श्रीमंत लोकांपासून सगळेच या पत्रावळी मध्ये जेवत असतं. पण आता हा उपयोग कमी होताना दिसतो आहे मध्यातरी थरमाकॉलच्या पत्रावळ्या निघाल्या होत्या पण आता त्या बंद आहेत.

आता तर सर्वच बदलले आहे काही ठिकाणी स्टीलची ताटे वापरली जातात तर काही ठिकाणी सिल्व्हर कव्हर असणारी पत्रावळी वापरली जाते. शिवाय कागदाच्या पत्रावळी वापरल्या जातात त्यांच्यावर चमक येण्यासाठी त्यावर मेनाची कोटिंग केली जाते. हे सर्व आपल्या शरीरासाठी घातक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का ही जुन्या पद्धतीची पत्रावळी तुमच्या शरीरासाठी किती उपयोगी आहे.

पळसाच्या पानांच्या पत्रावळी मध्ये जेवल्याने अन्न चांगले पचन होते. शिवाय त्या पत्रावळीला जोडण्यासाठी ज्या काड्या वापरतात त्या लिंबाच्या असतात त्यामुळे त्या पत्रावळी ला कीड लागत नाही. तुम्ही जेवणासाठी वेगळवेगल्या खणांच्या पत्रावळी वापरू शकता तसेच वाट्या आणि डिश मिळतात. या पत्रावळ्या पहिली गोष्ट म्हणजे पैशाची बचत करतात कारण त्या इतक्या महाग ही नसतात. शिवाय त्यांच्या वापरामुळे ते घासण्यासाठी लागणारी मेहनत ही लागत नाही वेळ ही वाचतो शिवाय पाणी वाचतो.

पूर्वीच्या काळी लोक पळसाच्या पानात किंवा केळीच्या पानात रोज जेवण करायचे त्यामुळे ते जेवण साधे असले तरीही त्याच्यातून अनेक गुणधर्म शरीराला मिळायचे. पूर्वीच्या सर्वच होती आपण हळू हळू विसरत चाललो आहोत त्यामुळे खरतर आपण शरीराने कमकुवत होत चाललो आहोत आणि अनेक आजाराने आपल्याला ग्रासले आहे.

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *